esakal | बारामतीतील या 30 पुलांचे लवकरच भाग्य उजाळणार  
sakal

बोलून बातमी शोधा

baramati road

बारामती तालुक्यातील अनेक रस्त्यांवरचे पूल जुने असून, ओढे- नाल्याचे पाणी पावसाळ्यात या पुलावरून जाते. पुलावर पाणी आल्याने अनेकदा वाहतूकही ठप्प होते. त्यामुळे या पुलांची उंची वाढविण्यासह पूल अधिक रुंद करण्याची या भागातील नागरिकांची सातत्याने मागणी होते आहे.

बारामतीतील या 30 पुलांचे लवकरच भाग्य उजाळणार  

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती तालुक्यातील अनेक पुलांची काल झालेल्या अतिवृष्टीनंतर दुरवस्था झाली आहे. या पुलांची पाहणी करून या ठिकाणी नव्याने पूलउभारणी व उंची वाढविण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने कालपासूनच तयारी सुरु केली आहे, असी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विश्वास ओहोळ यांनी दिली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
बारामती तालुक्यातील अनेक रस्त्यांवरचे पूल जुने असून, ओढे- नाल्याचे पाणी पावसाळ्यात या पुलावरून जाते. पुलावर पाणी आल्याने अनेकदा वाहतूकही ठप्प होते. त्यामुळे या पुलांची उंची वाढविण्यासह पूल अधिक रुंद करण्याची या भागातील नागरिकांची सातत्याने मागणी होते आहे. मोठा पाऊस आल्यानंतर या समस्येला लोकांना सामोरे जावे लागते. बारामती तालुक्यात ग्रामीण भागात अशा प्रकारचे जवळपास 25 छोटे पूल आहेत. अशा पूलांवर दर पावसाळ्यात पाणी येते. पुलावरच्या रस्त्याची दुरवस्था होते, ही बाब विचारात घेत आता या पुलांची नव्याने उभारणी करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या शिवाय राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील पाच ते सहा पूलही या अंतर्गत नवीन करण्याचे नियोजन आहे. 

आता लग्नाची सीडीही पोलिस ठाण्यात द्यावी लागणार

ग्रामीण भागातील रस्त्यांवरील पूल उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नाबार्डकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यानंतर कर्जस्वरुपात रक्कम उभारुन ही कामे केली जातील, असे ओहोळ यांनी नमूद केले. साधारपणपणे 22 कोटी रुपयांची रक्कम या साठी अपेक्षित आहे. या पुलांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे कामही बांधकाम विभागाने आता सुरु केले आहे.