
पुणे : दिवंगत झेडपी कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळणार
पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना जिल्हा परिषदेत उद्या (ता.२७) नोकरी दिली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने अनुकंपा तत्त्वावरील नोकर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि ज्येष्ठताक्रमानुसार पात्र उमेदवारांची प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता आणि रिक्त जागांच्या संख्येच्या प्रमाणात ही नोकर भरती केली जाणार आहे.
या नोकर भरतीसाठी अनुकंपा तत्त्वावरील कर्मचारी भरतीसाठीच्या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता आणि ज्येष्ठता क्रमानुसार बोलाविण्यात आले आहे. सध्या तरी केवळ आरोग्य विभागातील आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकांचीच सुमारे १५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उद्या (ता.२७) या पदासाठी पात्र असलेल्या वारसांनाच नोकरी मिळू शकणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
ही नोकरभरती जिल्हा परिषद मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील शरदचंद्र पवार सभागृहात सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे. यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसाद यांनी केले आहे.
Web Title: Heirs Employees Died Service Zilla Parishad Panchayat Samiti Given Jobs Zilla Parishad Tomorrow
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..