पुण्यातील महिलांना केली हेलकॉप्टरमधून सफर

आतापर्यंत बरेच जण आहेत ज्यांनी हेलिकॉप्टर आणि विमान फक्त आकाशात उड्डाण करताना पाहिले असेल पण, पुण्यातील काही महिलांना हेलकॉप्टरमधून सफर करण्याची संधी मिळाली.
Helicopter
Helicoptersakal

पुणे - आतापर्यंत बरेच जण आहेत ज्यांनी हेलिकॉप्टर आणि विमान फक्त आकाशात उड्डाण करताना पाहिले असेल पण, पुण्यातील काही महिलांना हेलकॉप्टरमधून सफर करण्याची संधी मिळाली आहे. भगवा फेटा बांधून महिलांनी या सफरीचा आनंद आज घेतला. नवरात्रीनिमित्त ऑनलाइन उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या 111 महिलांना मोफत हेलिकॉप्टरची सफर करण्याची संधी देण्यात आली.

जनता वसाहत येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी ऍड योगेश आढाव आणि निर्मल फाउंडेशन यांनी या उपक्रमाचे आयोजन केलं होते.

Helicopter
दिवाळीत सुकामेव्याचा गोडवा; उत्पादन आणि आवक वाढल्याने दरात घट

नवरात्रोत्सवानिमित्त ही ऑनलाईन उखाणा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात उल्लेखनीय ठरलेल्या 111 महिलांना मोफत हेलिकॉप्टरमधून सफर करण्याची संधी देणार असल्याचे आधीच सांगितलं होते. त्यानुसार सहभागी झालेल्या 111 महिलांना आज हेलिकॉप्टमधून सफर करण्याची संधी आज मिळाली.

खराडी येथील एका हेलिपॅडवर या एकशे अकरा महिला भगवा फेटा बांधू संपूर्ण तयारनिशी उपस्थित होत्या. त्यानंतर एक-एक करून या महिला हेलिकॉप्टरची सफरचा आनंद घेत आहेत.

हेलीकॉप्टरची सफर पंधरा मिनिटांची ही सफर केल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावर एक मोठे समाधान पाहायला मिळालं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com