सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे - शहर वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसक्‍तीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला बुधवारी सरकारी कर्मचाऱ्यांपासून सुरवात केली. येथील मध्यवर्ती सरकारी इमारतीजवळ विनाहेल्मेट दुचाकीस्वार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच त्यांचे समुपदेशन करण्यात येत होते. दरम्यान, आज दिवसभरात विनाहेल्मेट सरकारी कर्मचाऱ्यांसह एकूण 594 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यासोबतच हेल्मेट न वापरणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

पोलिसांनी एक जानेवारीपासून हेल्मेटसक्‍ती करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला काहींनी पाठिंबा दर्शविला, तर काही संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे हेल्मेटसक्‍तीबाबत सध्या नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. परंतु गेल्या काही दिवसांत शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यात जखमी आणि मृत्युमुखी पडणाऱ्या वाहनचालकांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी हेल्मेट आणि सीटबेल्ट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई सुरू केली आहे. 

महाविद्यालयीन विद्यार्थी- कर्मचाऱ्यांवरही कारवाई 
शहरातील काही प्रमुख महाविद्यालयांसमोर विनाहेल्मेट विद्यार्थ्यांवरही कारवाई करण्यात येत होती. फडके हौद चौकातील आरसीएम गुजराथी हायस्कूल, पूना कॉलेज येथील विद्यार्थी आणि तेथील कर्मचाऱ्यांचे हेल्मेट वापराबाबत प्रबोधन करण्यात आले. 

वाहनचालकांचे उद्या समुपदेशन 
शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी (ता. 7) सकाळी 11 वाजता शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील आरएसपी शेडमध्ये समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

विरुद्ध दिशेने येणाऱ्यांवर गुन्हे दाखल 
साधू वासवानी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा यादरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या 31 वाहनचालकांवर कलम 279 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. बंडगार्डन वाहतूक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. 

विनाहेल्मेटच्या कारवाईची तीव्रता वाढणार 
शहरात एक जानेवारीपासून हेल्मेटसक्‍तीच्या निर्णयाबाबत विचारले असता, दुचाकीस्वारांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट परिधान करणे कायद्याने बंधनकारक आहे. हेल्मेटसक्‍तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याची तीव्रता वाढत जाईल. तसेच, हेल्मेट परिधान करण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे, असे वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्‍त तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले.

Web Title: Helmet compulsion to government employees