हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना दंड

बाजीराव रस्ता - हेल्मेट न वापरणाऱ्यांकडून दंड वसुली केली जात असून नो पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाक्‍यांना लावलेले जॅमर.
बाजीराव रस्ता - हेल्मेट न वापरणाऱ्यांकडून दंड वसुली केली जात असून नो पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाक्‍यांना लावलेले जॅमर.

पुणे - हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. दंडाची रक्कम प्रलंबित असणाऱ्या दुचाकींना जॅमर लावणे, विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांसह रिक्षाचालकांवरही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जात आहे.

पोलिस आयुक्त डॉ.  के. वेंकटेशम यांनी दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मध्यवर्ती भागासह प्रमुख चौक, मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरही कारवाई सुरू आहे. 

दोन-तीन महिन्यांतील अपघातांत हेल्मेट नसल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढत असल्याने पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. तसेच नो-पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांना जॅमर लावले जात आहे. विनागणवेश, बॅच नसणाऱ्या रिक्षाचालकांवरही कारवाई सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com