Amitesh Kumar : हेल्मेट अनिवार्य, मात्र सक्तीबाबत चर्चा करूनच निर्णय

‘दुचाकीस्वार वाहनचालकांनी हेल्मेट परिधान करणे कायद्यानुसार अनिवार्य आहे. परंतु प्रथम हेल्मेटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईल.
Pune Police Commissioner Amitesh Kumar
Pune Police Commissioner Amitesh Kumarsakal

पुणे - ‘दुचाकीस्वार वाहनचालकांनी हेल्मेट परिधान करणे कायद्यानुसार अनिवार्य आहे. परंतु प्रथम हेल्मेटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईल. त्यामध्ये नागरिकांचा प्रतिसाद पाहून आणि संबंधित घटकांशी चर्चा केल्यानंतरच हेल्मेट सक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल,’’ असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (ता. ७) सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक कोंडी आणि हेल्मेट सक्तीबाबत अमितेश कुमार म्हणाले, ‘दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे कायद्याने अनिवार्य आहे. परंतु हेल्मेटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईल. संबंधित घटकांशी चर्चा केल्यानंतर हेल्मेट सक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल.’

दरम्यान, पुणे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अपघाती मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट परिधान करणे कायद्याने अनिवार्य आहे. परंतु शहरात काही संघटनांकडून वाहतूक कोंडी आणि वाहतुकीचा वेग कमी असल्याचे कारण देत हेल्मेट सक्तीला विरोध झाला आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनीही मंगळवारी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी हेल्मेटबाबत जनजागृती करावी. त्यानंतर हेल्मेट सक्तीबाबत विचार करावा, असे आवाहन केले होते.

वाहतूक कोंडी सोडविण्यास प्राधान्य -

पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. दररोज नागरिकांना वाहतूक कोंडीत बराच वेळ अडकून पडावे लागते. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी प्रमुख दहा ते बारा चौक आणि रस्ते (हॉटस्पॉट) निश्चित केले आहेत.

महापालिका आणि संबंधित एजन्सींसमवेत चर्चा करून कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचे लगेचच परिणाम दिसून येतील असे नाही. परंतु त्यासाठी संबंधित एजन्सींबाबत चर्चा सुरू केली आहे.’ पहिल्या टप्प्यात गणेशखिंड रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आनंद ऋषिजी महाराज चौक, शिवाजीनगर, औंध, बाणेर, पाषाण, स्वारगेट परिसर, कात्रज-कोंढवा रस्ता, खडी मशिन चौक, वाघोली, नगर रस्ता, नवले पूल यासह काही चौक निश्चित करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com