व्हिटगन कंपनीकडून आश्रमशाळेला भरीव मदत

रमेश वत्रे
शनिवार, 21 जुलै 2018

केडगाव (पुणे) : गलांडवाडी (ता.दौंड) येथील अनाजी खाडे आश्रमास भांडगाव (ता.दौंड ) येथील व्हिटगन कंपनीकडून दैनंदिन साहित्याची मदत करण्यात आली आहे. अशी महिती संस्थेचे अध्यक्ष खंडेराव खाडे यांनी दिली. 

केडगाव (पुणे) : गलांडवाडी (ता.दौंड) येथील अनाजी खाडे आश्रमास भांडगाव (ता.दौंड ) येथील व्हिटगन कंपनीकडून दैनंदिन साहित्याची मदत करण्यात आली आहे. अशी महिती संस्थेचे अध्यक्ष खंडेराव खाडे यांनी दिली. 

सरकारी मदत न घेता खाडे आश्रमशाळा गेल्या 20 वर्षापासून चालविली जात आहे. येथे यंदा 30 निराधार मुले राहत आहेत. ही मुले खुटबाव (ता.दौंड) येथील भैरवनाथ विद्यालयात शिकत आहेत. सरकारी अनुदान नसल्याने आश्रमशाळा आर्थिक अडचणीत आहे. दै.सकाळमधून आश्रम शाळेच्या अडचणी मांडण्यात आल्याने मदतीसाठी दानशूर पुढे येत आहेत. पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व पोलिस कर्मचारी गणेश झरेकर यांनी कंपनीला मदतीसाठी विनंती केली होती. त्यानंतर कंपनीने पाहणी करून रंगरंगोटी, 30 पलंग, 30 गाद्या, बेडशीट, उशा, 30 लॅाकर, पंखे, पाण्याची टाकी, इमारतीच्या डागडुजी करून दिली. या मदतीबद्दल श्री. खाडे यांनी समाधान व्यक्त केले आहे. मदतीपुर्वी विद्यार्थी जमीनीवर झोपत असत. आता नक्षीदार पलंग, रंगीबेरंगी बेडसीट, गादी मिळाल्याने विद्यार्थी खुश आहेत. आश्रमशाळेला भाज्या साठविण्यासाठी फ्रिज व वीजेच्या खर्चात बचत होण्यासाठी सौर पॅनलची गरज आहे.  

कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी नीना निकम, नियाज जामदार, शौकत शेख, अमोल देशमुख, रमेश पालागिरी यांनी संस्थेस नुकतीच भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या अधिका-यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ निळकंठ शितोळे, उत्तम ताकवले, ज्ञानदेव कदम, चंद्रकांत कदम, संदीप शितोळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन माजी विद्यार्थी बापू नवले, बापू बडे यांनी केले. सूत्रसंचालन सुदाम भापकर यांनी केले अधीक्षक बापू गोफणे यांनी आभार मानले.

आश्रमशाळेला15 वर्ष मोफत दूध
गलांडवाडी येथील राजहंस दूध संस्थेकडून आश्रमशाळेला गेली १५ वर्षे रोज १० लिटर दूधाचा मोफत पुरवठा केला जात आहे. आश्रमशाळेला कुठलीही सरकारी मदत मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन आश्रमशाळेने न मागता राजहंस दूध संस्था ही मदत करीत आहे. याबद्दल खाडे यांनी राजहंस संस्थेचे सभासद व संचालक मंडळाचे विशेष आभार मानले. संस्थेचे व्यवस्थापक संदीप शितोळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

Web Title: help to ahsramshala by vitgan company