#NANOCON नॅनोटेक्‍नॉलॉजीच्या साहाय्याने देशासमोरील आव्हानांवर मात करणे शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

पुणे : "देशासमोरील आव्हानांवर नॅनोटेक्‍नोलॉजीच्या साहाय्याने उत्तर शोधणे आवश्‍यक आहे. नॅनोटेक्‍नोलॉजीला आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह अन्य प्रगत तंत्रज्ञानाची जोड दिल्यास त्यातून होणाऱ्या संशोधनाचा समाजाला व्यापक फायदा होऊ शकतो. म्हणूनच अशा संशोधकांच्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी केंद्र सरकारने संशोधन क्षेत्रातील गुंतवणूक वाढवली आहे. त्यासाठी देशात तंत्रज्ञान केंद्र निर्माण केली जात असून या केंद्रांसह स्टार्ट अपचे जाळेही विस्तारले जाणार आहे,'' अशी माहिती केंद्रीय लघु व मध्यम उद्योग विभागाचे सहसचिव सुधीर गर्ग यांनी दिली. 

भारती अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित चौथ्या नॅनोकॉन परिषदेचे उद्‌घाटन गर्ग यांच्या हस्ते गुरुवारी झाले. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, अमेरिकेतील ड्रॅक्‍सेल विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बायोमेडिकल इंजिनिअरिंगचे अधिष्ठाता डॉ. पॉल रॉफ, अमेरिकेच्या जॉइंट स्कूल फॉर नॅनो सायन्स अॅंड नॅनो इंजिनिअरिंगचे अंतरिम अधिष्ठाता डॉ. जोसेफ ग्रीव्हज, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव हे यावेळी उपस्थित होते. भारती विद्यापीठ आणि ड्रॅक्‍सेल विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

"नॅनोटेक्‍नोलॉजी आणि नॅनोसायन्स या क्षेत्रात प्रगतीमुळे मोठे बदल होणार आहेत. नॅनोतंत्रज्ञानामुळे विविध प्रकारच्या नव्या उत्पादनांची निर्मिती शक्‍य आहे.'' असे डॉ. कदम यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the help of nanotechnology it is possible to overcome challenges ahead of the country