सकाळ रिलिफ फंडाच्या माध्यमातून ओढा खाेलीकरणास सुरवात

राजकुमार थोरात
बुधवार, 4 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातुन सुरु असलेल्या ओढाखोलीकरण व रुंदीकरणाच्या कामामुळे गावे पाणीदार होत असल्याचे गौरवोद्गार पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी व्यक्त केले.

रुई (ता.इंदापूर) येथे सकाळ रिलीफ फंड व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ओढाखोलीकरण व रुंदीकरणाच्या उद्धघाटन प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी पद्माकर लावंड, यशवंत कचरे, अजित मारकड, बबन मारकड, अंकुश लावंड, मोहन लावंड, पांडुरंग डोंबाळे, अर्जुन मारकड, किरण लावंड, ज्ञानदेव गावडे उपस्थित होते. यावेळी माने यांनी सांगितले की, सकाळ माध्यम समुहाने सुरु केलेल्या ओढाखोलीकरण व रुंदीकरणाच्या उपक्रमामुळे पाण्याचे जलस्त्रोत बळकट होण्यास मोलाची मदत झाली आहे. गावातील पाण्याची पातळी वाढली असून गावे पाणीदार झाली आहे. यावेळी माने यांच्या हस्ते ओढा खोलीकरण व रुंदीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वालचंदनगर सकाळचे बातमीदार राजकुमार थोरात व कळसचे बातमीदार सचिन लाेंढे उपस्थित होते. 

Web Title: with the help of sakal relief fund starting a work of water storage