esakal | बारामतीच्या दोन माजी उपनगराध्यक्षांकडून मदतीचा हात
sakal

बोलून बातमी शोधा

hand

कोरोनाच्या काळात अनेकांनी गरजूंसाठी मदतीचे हात पुढे केले. बारामतीच्या दोन माजी उपनगराध्यक्षांनीही यात दिलेले योगदान महत्वपूर्ण होते. 

बारामतीच्या दोन माजी उपनगराध्यक्षांकडून मदतीचा हात

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोनाच्या काळात अनेकांनी गरजूंसाठी मदतीचे हात पुढे केले. बारामतीच्या दोन माजी उपनगराध्यक्षांनीही यात दिलेले योगदान महत्वपूर्ण होते. विद्यमान नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष असलेले जय पाटील व बिरजू मांढरे यांनी या काळात महत्वाची जबाबदारी पार पाडली. 

मुंबईहून जुन्नरमध्ये येताय तर...

बारामतीत ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे, त्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य उपलब्ध होत होते, मात्र अनेक अशी कुटुंबे होती, ज्यांच्याकडे शिधापत्रिका नसल्याने उपासमारीची वेळ येऊ लागली होती. मात्र, जय पाटील यांनी जवळपास दोन हजार किटच्या माध्यमातून गरजूंना अन्नधान्याची मदत केली. या शिवाय नगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही त्यांनी मदतीचा हात दिला. इतर मदत मिळविताना विविध नियम व अटींची पूर्तता करावी लागत होती, मात्र ऐन लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या या मदतीचा गरजू कुटुंबाना मोठा फायदा झाला. 

बारामतीत हाॅटेलला परवानगी न मिळाल्यास

विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे यांनीही आमराई परिसरातील सातशे कुटुंबियांना दररोज भोजन देण्याचा उपक्रम राबविला. ऐन लॉकडाउनच्या काळात या उपक्रमाचा शेकडो कुटुंबांना फायदा झाला. ज्या काळात शहर पूर्णपणे बंद होते, अशा काळात लोकांना थेट जेवण मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्यासह अनेक मान्यवरांनी बिरजू मांढरे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या काळात लोकांना परिपूर्ण भोजन देण्याच्या या प्रयत्नामुळे या परिसरात अनेक कुटुंबांची सोय झाली होती.