जवानांच्या अनाथ मुलांना मदत

माजी सैनिक कल्याण विभागाच्यावतीने माजी सैनिकांच्या अनाथ मुलांना काहीशी आर्थिक मदत केली जाते.
Money
Money sakal
Summary

माजी सैनिक कल्याण विभागाच्यावतीने माजी सैनिकांच्या अनाथ मुलांना काहीशी आर्थिक मदत केली जाते.

पुणे - माजी सैनिक कल्याण विभागाच्यावतीने माजी सैनिकांच्या अनाथ मुलांना काहीशी आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे अशा अनाथ मुलांसाठी माजी सैनिक योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत २०१७ ते २०२० या कालावधित ५२ अनाथ मुलांना मदत करण्यात आली. यामध्ये सहा लाख २४ हजार रुपये इतकी रक्कम वाटण्यात आली आहे.

देशसेवेसाठी कुटुंब आणि समाजापासून लांब राहणाऱ्या जवानांना निवृत्तीनंतर विविध योजनांच्या माध्यमातून सेवा पुरविण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचा माजी सैनिक कल्याण विभाग कार्यरत आहे. यामध्ये माजी सैनिकांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती, मुलींच्या लग्नाच्या खर्चासाठी ठराविक मदत, वैद्यकीय किंवा कर्ज सेवेसाठी आर्थिक मदत, वैद्यकीय उपकरणे अशा विविध योजनांचा समावेश आहे. त्यातील एक म्हणजेच माजी सैनिकांच्या अनाथ मुलांसाठी दर महिन्याला एक हजार रुपयांची मदत दिली जाते.

देशाच्या संरक्षणाचे कार्य करताना सशस्त्र दलातील जवान सहसा समाजापासून दूर राहतात. त्यांच्यापैकी काहींनी सेवेतून सुटल्यानंतर लग्न केल्यास त्यांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर मुले होतात. अपघातात किंवा नैसर्गिक कारणांमुळे/रोगामुळे माजी सैनिक आणि त्यांच्या जोडीदाराच्या मृत्यूच्या घटनेमुळे ही मुलं अनाथ होतात. अनेकदा या अनाथ मुलांकडे त्यांचे नातेवाईक दुर्लक्ष करतात. त्यात आर्थिक सहाय्यता नसल्याने त्यांच्या अडचणी वाढतात. ही समस्या सर्वाधिक जास्त सेवानिवृत्तिवेतन मिळत नसलेल्या माजी सैनिकांच्या अनाथ मुलांच्या बाबतीत दिसून येते.

काय आहे योजना...

सेवानिवृत्तिवेतन मिळत नसलेल्या माजी सैनिकांच्या मुलांना आधार देणे आणि त्यांचे शिक्षण, निवास सुनिश्चित करणे ही संस्थेची जबाबदारी आहे. त्याच अनुषंगाने या योजनेची सुरुवात झाली. या योजनेंतर्गत मुलांना वयाच्‍या २१ व्या वर्षापर्यंत, तर मुलींना त्यांचे लग्न होईपर्यंत प्रत्येक महिन्याला हजार रुपये आर्थिक मदत पुरवली जाते. या योजनेबाबत अनेकांना माहिती नसल्याने लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेबाबत लोकांमध्ये जागृती करण्याची आवश्‍यकता माजी सैनिक विभागाने व्यक्त केली आहे.

वर्ष लाभार्थ्यांची संख्या योजनेंतर्गत झालेले वाटप (रुपयांमध्ये)

२०१७-१८ ११ १ लाख ३२ हजार

२०१८-१९ १८ २ लाख १६ हजार

२०१९-२० २३ २ लाख ७६ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com