पुणे-मुंबईतील कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाइन; टाटा-सिप्लाचा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cancer_Patient

'टाटा मेमोरियल सेंटर' आणि 'सिप्ला पेलिएटिव्ह केअर अॅण्ड ट्रेनिंग सेंटर' यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका यांच्या सहयोगाने केन-हेल्पर (कॅन्सर हेल्पलाइन फॉर इमोशनल रिस्पाइट) ही सेवा सुरू केली आहे.​

पुणे-मुंबईतील कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाइन; टाटा-सिप्लाचा उपक्रम

पुणे : पुणे आणि मुंबईतील कॅन्सरचे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना कॅन्सरशी निगडित मार्गदर्शन मिळण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम अनुभवी समुपदेशकांद्वारे चालविण्यात येणार असून ही सेवा 9511948920 या टोल-फ्री नंबरवर आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत मराठी, इंग्रजी आणि हिंदीतून उपलब्ध असणार आहे.

- समाजाच्या विघ्नहर्ता स्वरूपाचा अभूतपूर्व जागर; ‘सकाळ’चा उपक्रम

कॅन्सरचे रुग्ण आणि त्यांची देखभाल करणाऱ्या व्यक्ती, विशेषत: आजार अधिक गंभीर टप्प्यावर पोहोचलेल्या रुग्णांची विशिष्ट मनाची व सामाजिक गरज समजून घेत, अशा व्यक्तींना भावनिक आधार देण्यासाठी 'टाटा मेमोरियल सेंटर' आणि 'सिप्ला पेलिएटिव्ह केअर अॅण्ड ट्रेनिंग सेंटर' यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका यांच्या सहयोगाने केन-हेल्पर (कॅन्सर हेल्पलाइन फॉर इमोशनल रिस्पाइट) ही सेवा सुरू केली आहे.

'जेव्हा देव स्वत: आपला देश चालवत आहेत...'; काय म्हणाले कुमार विश्वास?

या सेवेविषयी बोलताना टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक, डॉ. बडवे म्हणाले, "कोविड-19 महामारीचा रुग्णांवर परिणाम झाला आहे. विशेषतः कॅन्सरचे दुखणे बळावलेल्या रुग्णांसह इतर दुर्धर आजारांशी झगडणाऱ्या रुग्णांसाठी तर अनर्थकारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात या हेल्पलाइनच्या माध्यमातून आम्ही रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांवरील ताण कमी करण्यासाठी गरजेचे असलेले मनोसामाजिक (मानसिक आणि सामाजिक) समुपदेशन पुरवू शकू, अशी आम्हाला आशा आहे.

रुग्णांच्या देखभालीत खंड पडू नये, यासाठी या प्रयत्नामध्ये आम्ही पेशंट नेव्हिगेटरचाही समावेश करणार आहोत. कॅन्सरच्या रुग्णांवरील मानसिक ताण, चिंता आणि नैराश्य यांची पातळी कमी करण्यासाठी मनोसामाजिक पाठबळ अत्यंत महत्वाची भूमिक बजावत असल्याचे दिसून आले आहे, असे त्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)