उजनीमधील हेमाडपंती मंदिराची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

कळस - उजनी धरण होण्यापूर्वीच्या पळसदेव (ता. इंदापूर) गावाचे वैभव असलेल्या हेमाडपंती मंदिराची दुरवस्था झाली आहे. दरवर्षी उजनी धरण भरल्यानंतर पाण्याखाली जाणारे हे मंदिर उन्हाळ्यात पूर्णपणे उघडे पडते. या मंदिरावरील दगडांवर विविध प्रकारची शिल्पे साकारण्यात आलेली आहेत. पुरातन काळातील हा दुर्मिळ ठेवा जतन करण्याची गरज आहे. 

भीमा नदीतीरावर वसलेल्या पळसदेव गावाचे १९७६ मध्ये उजनी धरणामुळे पुनर्वसन झाले. नदीच्या काठावरील या गावचा प्रमुख व्यवसाय हा शेती होता. धरण बांधणीनंतर या ग्रामस्थांचे गावालगतच्या टेकडीवर पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन झाले खरे, मात्र ग्रामस्थांनी आपल्या जमिनी, घरे, मंदिरे आहे त्या स्थितीत सोडून दिले. केवळ ग्रामदैवत पळसनाथाच्या मंदिराचे स्थलांतर करण्यात आले. 

जुन्या मंदिरातील महादेवाची पिंड नवीन मंदिरात स्थापन करण्यात आली. तर हे जुने दगडी मंदिर मात्र आहे त्याच स्थितीत ठेवण्यात आले. काही ठिकाणी मंदिराची पडझड झाली आहे. अनेक दुर्मिळ शिल्पे खाली पडलेली आहेत. काही शिल्पांचे तुकडे झाले आहेत.

Web Title: hemadpanthi temple issue