उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही खडसेंविरोधात गुन्हा नोंद नाही

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही खडसेंविरोधात गुन्हा नोंद नाही

पुणे - उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही एमआयडीसी भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही, असा आरोप याचिकाकर्ते हेमंत गवंडे यांनी केला आहे.

हा भूखंड गैरव्यवहार गवंडे यांनी पुढे आणला आहे. त्यासंदर्भात त्यांनी

उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मंत्रिपदावर असताना खडसे यांनी या जागेसंदर्भात एप्रिल 2016 मध्ये मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक घेतली. त्यानंतर पंधरा दिवसांतच जागेचे खरेदीखत केले. या जागेचे बाजारभावाप्रमाणे मूल्य 31 कोटी रुपये इतके असूनही, खडसे यांनी पदाचा गैरवापर करून ते पावणेचार कोटी रुपये इतकी दाखविले. त्यांनी आयकर खात्याचीही फसवणूक केली आहे. या जागेचे भूसंपादन झाल्यानंतर त्याच्या मोबदल्यापोटी सुमारे 80 कोटी रुपये मिळविणे हाच हेतू यामागे असल्याचे गवंडे यांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने गवंडे यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याबाबत न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे कुटुंबीयांविरुद्ध फिर्याद नोंदवून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली आहे. उच्च न्यायालयाने आदेश देऊन एक महिना उलटला तरी बंडगार्डन पोलिस ठाण्यात यासंदर्भात कोणतीही तक्रार नोंदविली गेली नाही, असा आरोप गवंडे यांनी केला आहे. उच्च न्यायालयानेही यापूर्वी गवंडे यांच्या तक्रार अर्जावर पोलिसांनी गुन्हा नोंदविला गेला नसल्याबद्दल ताशेरे ओढले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 एप्रिल रोजी होणार आहे.

या प्रकरणी कोणतीही टाळाटाळ केली जात नसल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी केला आहे. प्रक्रिया सुरू असून, गवंडे यांच्याकडे त्यांच्या तक्रारीसंदर्भातील कागदपत्रे मागितली आहेत. अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com