esakal | आळेफाटा उपबाजारात कांद्याला उच्चांकी बाजारभाव; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

on.jpg

कृषी उत्पन्न  बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारपेठेत मंगळवारी (ता. १८) रोजी लिलावात चांगल्या प्रतीच्या दहा किलो कांद्यास १७५ रुपये भाव मिळाला.

आळेफाटा उपबाजारात कांद्याला उच्चांकी बाजारभाव; वाचा सविस्तर

sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर : कृषी उत्पन्न  बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारपेठेत मंगळवारी (ता. १८) रोजी लिलावात चांगल्या प्रतीच्या दहा किलो कांद्यास १७५ रुपये भाव मिळाला.

तसेच मार्चपासून आजपर्यंतचा हा सर्वाधिक बाजारभाव असल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. बाजारात एकुण १० हजार ९३४ कांदा पिशवी ( क्विंटल ५४६७) आवक झाली होती. 

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

प्रतवारीनुसार मिळालेला भाव पुढील प्रमाणे :-                
एक नंबर १४० ते १७५,दोन नंबर १०० ते १४०, तीन नंबर ७० ते १००,चार नंबर  ४० ते ७० रविवार (ता.१६) रोजी जुन्नर, ओतूर व आळेफाटा येथील बाजारात कांद्याचे प्रती १० किलोचे बाजार भाव व आवक पिशवीमध्ये  अनुक्रमे १२६ ते १४०रुपये, (१२१९९), १२० ते १३५ रुपये (२०७१९) व ८० ते १४०रुपये (६५२३) रुपये होते.  तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश या परराज्यातून  कांद्याला मागणी वाढली असल्याने कांद्याचे  बाजार भाव वाढले असल्याचे सांगण्यात आले. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)