

Pune Power Crisis High Voltage Line Blast Leaves Over 300000 Consumers Without Power and Disrupts Bus and Metro Services
sakal
पुणे/पिंपरी : महापारेषण कंपनीच्या चिंचवड उपकेंद्रातील (२२० केव्ही) अतिउच्चदाब वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड होऊन स्फोट झाला. यामुळे मोठी आग लागली. ही घटना रविवारी (ता. ६) दुपारच्या सुमारास घडली. यामुळे पिंपरी चिंचवडच्या बहुतांश भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. तसेच पुण्यातील शिवाजीनगरसह औंधचा काही भाग, तळेगाव दाभाडे, आंबेठाण परिसराचा पुरवठादेखील विस्कळित झाला. यामुळे पिंपरी चिंचवड परिसरातील २ लाख ६० हजार, तर पुण्यातील ५० हजार ग्राहकांना याचा फटका बसला.