शहरात दोन दिवसांत पुन्हा गारठा वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे - शहरात उकाडा वाढला असला, तरीही पुढील दोन दिवसांमध्ये हवेतील गारठा पुन्हा वाढण्याची शक्‍यता वेधशाळेतर्फे सोमवारी वर्तविण्यात आली. पुण्यात सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान 12.1 अंश सेल्सिअस नोंदले गेले; तर दिवसाच्या तापमानाची 32.2 अंश सेल्सिअस नोंद झाली. 

शहरात दिवसभर आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका जाणवत होता. उकाडाही वाढला होता. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल देणारे वातावरण पुणेकरांनी अनुभवले. कमाल तापमानाच्या सरासरीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले होते. 

पुढील चार ते पाच दिवसांमध्ये हवेतील गारठा पुन्हा वाढण्यास पोषक वातावरण तयार होत आहे. फेब्रुवारीत राज्यासह पुण्यातील तापमानात घट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीलगतच्या अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) निर्माण झाल्याने उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह सोमवारी महाराष्ट्राकडे येत होते. यामुळे विदर्भातील तापमानात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. विदर्भातील गोंदिया येथे सोमवारी राज्यातील नीचांकी 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारपर्यंत दोन-तीन दिवसांत विदर्भातील तापमानात घट होण्याची शक्‍यता आहे. शनिवारपर्यंत पुण्याच्या तापमानाचा पारा थोडासा उतरणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: high weather two days in the city