esakal | ग्राहकांनो, वीजबिल ऑनलाइन माध्यमांद्वारे भरा; महावितरणने का केलं असं आवाहन?
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity_Bill

कोविड-19 च्या प्रादुर्भावामध्ये धनादेश जमा करण्यासाठी बॅंका किंवा महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात जाण्याचा धोका पत्करण्याऐवजी घरबसल्या ऑनलाईन पर्यायांद्वारे वीजबिलांचा भरणा ग्राहकांनी करावा.

ग्राहकांनो, वीजबिल ऑनलाइन माध्यमांद्वारे भरा; महावितरणने का केलं असं आवाहन?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बॅंकेतील कामकाजावर परिणाम झालेला असून वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत आहेत. त्यामुळे वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी धनादेशाऐवजी ऑनलाईन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

अरे देवा! लाॅकडाऊन उठला पुणेकरांच्या मुळावर; जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडवले​

जून महिन्यात प्रतिबंध क्षेत्र वगळता उर्वरित भागात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महावितरणने वीजमिटरचे रीडिंग आणि वीजबिलांचे वाटप तसेच वीजबिल भरणा केंद्र सुरू केले आहे. ग्राहकांनी धनादेशाद्वारे वीजबिलांचा भरणा केला असेल, तर नियमानुसार ज्यादिवशी धनादेश वटविला जाईल, त्याच दिनांकाला सदर रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग केली जाते. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक बॅंकांमध्ये मनुष्यबळांची संख्या मर्यादित असून प्रतिबंध क्षेत्रातील बॅंक बंद करण्यात आलेल्या आहेत.

पुण्यात अजित पवारांनी लॉकडाऊन केलं अन् रोहित पवार म्हणतात...

त्यामुळे ग्राहकाने वीजबिलाकरिता धनादेश दिला असेल तर बॅंकांकडून धनादेश वटविण्यास उशिर होत आहे. वीजबिलांच्या देय मुदतीनंतर धनादेश वटल्यास पुढील महिन्याचे बिल थकबाकीसह येण्याची शक्‍यता आहे. तसेच काही कारणास्तव धनादेश न वटल्यास ( बाऊंस) महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यासाठी 750 रुपये दंड देखील पुढील वीजबिलात लागू शकतो. यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. 

लॉकडाउनमुळे सामान्यांचे किचन बजेट कोलमडणार; भाज्यांसह फळांच्या दरात...​

तसेच कोविड-19 च्या प्रादुर्भावामध्ये धनादेश जमा करण्यासाठी बॅंका किंवा महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात जाण्याचा धोका पत्करण्याऐवजी घरबसल्या ऑनलाईन पर्यायांद्वारे वीजबिलांचा भरणा ग्राहकांनी करावा. ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी महावितरण मोबाईल अँप तसेच www.mahadiscom.in या वेबसाईटचा वापर करावा. याशिवाय वीजबिलांवर महावितरणच्या बॅंकेचे छापील तपशील असणाऱ्या ग्राहकांनी आरटीजीएस आणि एनईएफटीचा वापर करावा, असेही आवाहन महावितरणने केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top