esakal | व्यवसाय अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण व्हावे; रूपांतरण समितीची शिफारस
sakal

बोलून बातमी शोधा

Higher Secondary Business Curriculum Transformation Committee meeting in Pune

केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामार्फत सुरुवातीच्या काळात व्यवसाय अभ्यासक्रम चालविला जात होता. कालांतराने केंद्र सरकारने हात काढून घेतल्याने अभ्यासक्रमाचा संपूर्ण भार राज्य सरकारवर आला. त्यानंतर गेल्या तीन-चार वर्षांपासून सरकार उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) बंद करण्याच्या विचारात आहे. त्याला अनेक संघटनांनी यापूर्वीही विरोध दर्शविला आहे.

व्यवसाय अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण व्हावे; रूपांतरण समितीची शिफारस

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव

पुणे: विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयं रोजगाराची संधी देणारा, कौशल्यावर आधारित उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण करण्यात यावे, त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा आणि अभ्यासक्रमाला प्रोत्साहन द्यावी, अशी भूमिका या अभ्यासक्रमाच्या रूपांतणाबाबत स्थापन केलेल्या समितीतील सदस्यांनी मांडली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामार्फत सुरुवातीच्या काळात व्यवसाय अभ्यासक्रम चालविला जात होता. कालांतराने केंद्र सरकारने हात काढून घेतल्याने अभ्यासक्रमाचा संपूर्ण भार राज्य सरकारवर आला. त्यानंतर गेल्या तीन-चार वर्षांपासून सरकार उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) बंद करण्याच्या विचारात आहे. त्याला अनेक संघटनांनी यापूर्वीही विरोध दर्शविला आहे. दरम्यान मार्च महिन्यात राज्य सरकारने या संदर्भात उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम रूपांतरण समिती ही शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या अध्यक्षतेखाली  स्थापन केली. समितीच्या सदस्यांची बैठक औंध आय.टी.आय.मध्ये शुक्रवारी झाली. बैठकीत प्रशासकीय अधिकारी वगळता अन्य सर्व सदस्यांनी व्यवसाय अभ्यासक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मते मांडली. बैठकीत झालेल्या चर्चेबाबत आणि समितीने केलेल्या शिफारशींचा अहवाल पुढील आठवड्यात संबंधित सचिव आणि मंत्री महोदयांसमोर मांडला जाईल. त्यानंतर समिती अंतिम अहवाल तयार करून सरकारसमोर सादर करेल, अशी माहिती काळे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले,"या अभ्यासक्रमात काळानुरूप बदल करणे आणि पुरेसा निधी उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. मात्र आता नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात देखील कौशल्य विकासाला महत्त्व आहे. त्यामुळे या अभ्यासाक्रमाकडे त्याअनुषंगाने पहायला हवे." यावेळी व्होकेशनल टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. जयंत भाभे यांनी अभ्यासक्रमात शिकणारे विद्यार्थी, शिक्षक आणि अन्य कर्मचारी यांच्यावतीने बाजू मांडली. तसेच हा अभ्यासक्रम १०० टक्के यशस्वी करावा अन्यथा रस्त्यावर उतरावेच लागेल असे मत व्यक्त करत आंदोलनाचा इशाराही भाभे यांनी यावेळी दिला.

आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी मुदतवाढ

"गेल्यावर्षी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले राज्यातील जवळपास एक लाख २० हजार विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. तर अंदाजे सात हजार २०० शिक्षक आणि कर्मचारी अभ्यासक्रमाशी संलग्न आहेत. शिवाय हा अभ्यासक्रम कौशल्य आणि तांत्रिकदृष्टया महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा अभ्यासक्रम बंद होऊ देणार नाही. त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी आग्रही राहणार आहोत," 
- विक्रम काळे, शिक्षक आमदार आणि अध्यक्ष, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम रूपांतरण समिती

loading image
go to top