esakal | काय सांगता? बायकांना लागले तंबाखूचे डोहाळे; टक्केवारी धक्कादायक!
sakal

बोलून बातमी शोधा

The highest proportion of pregnant and lactating women who use tobacco in india
  • गर्भवती महिलांना तंबाखूचे डोहाळे 
  • तंबाखू खाणाऱ्या महिलांमध्ये गर्भवतींची संख्या लक्षणीय;
  • 'आयएजएमआर'ची श्‍वेतपत्रिका 

 

काय सांगता? बायकांना लागले तंबाखूचे डोहाळे; टक्केवारी धक्कादायक!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : जगातील तंबाखू सेवन करणाऱ्यांपैकी एक तृतीयांश लोकसंख्या भारतात आहे. पुरुष प्रधान असलेल्या या व्यसनाचे सेवन महिलाही करतात. अशा महिलांमध्ये गर्भवती आणि स्तनपान महिलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या श्‍वेतपत्रीकेतून समोर आले आहे.
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्रात 3.7 टक्के महिला तंबाखूचे सेवन करतात. धूम्रपान वगळता इतर पद्धतीने तंबाखू सेवन करणाऱ्या जगातील 24.8 कोटी लोकांपैकी तब्बल 82टक्के लोक म्हणजेच 23.2 कोटी लोक भारत आणि बांगलादेशमध्ये राहतात. देशात सुमारे 5 कोटी 82 लाख महिला तंबाखूचे सेवन करत असल्याचे "जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणा'तून पुढे आले आहे. कर्करोगासारख्या आजार बघता तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही श्‍वेतपत्रिका काढण्यात आली. 

महत्त्वपूर्ण निष्कर्ष :  
- पूर्वोत्तर राज्यात महिला सर्वाधिक तंबाखू सेवन करतात 
- तंबाखू खाणाऱ्या 17 टक्के महिलांना लहानपणापासूनच व्यसन 
- देशातील 5.8 टक्के प्रौढ तंबाखूचे व्यसन सोडण्यात यशस्वी होतात 
- 2010 च्या तुलनेत तंबाखू खाणाऱ्या महिलांचे प्रमाण 5 टक्‍क्‍यांनी घसरले 
- पुरुषांच्या तुलनेत महिला तंबाखूचे व्यसन सोडण्यास उत्सुक नसतात 
- देशात सरासरी 3.95 टक्के महिला तंबाखू सेवन करतात 
- तंबाखूचा वापर रोखण्यासाठी अधिक कडक अंमलबजावणीची आवश्‍यकता 


रात्रभर पाऊस; खडकवासला धरणाचे एक फुटाने उघडले सहा दरवाजे

तंबाखूचे दुष्परिणाम :  
- तोंडाचा आणि घशाचा कर्करोग 
- अन्ननलिकेचा कर्करोग 
- हृदयविकाराचा धोका वाढतो 
- पुरुषांपेक्षा महिलांना कर्करोगाचा धोका सर्वाधिक 
- मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्‍यता 


उपाययोजना :  
- तंबाखू सेवन करणाऱ्यांचा लिंगानूसार माहितीचे संकलन आवश्‍यक 
- महिलांमध्ये तंबाखू टाळण्यासंबंधी जनजागृती आवश्‍यक 
- तंबाखूचे सेवन का करण्यात येते, यावर संशोधनाची आवश्‍यक 
- चालीरीती आणि परंपरा यांचा अभ्यास करत जनजागृती करणे आवश्‍यक 

उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा पुणे दौरा; सीईटीबाबत दिली महत्वाची माहिती
- तंबाखू सेवन करणाऱ्या महिलांचे (वय 15 ते 49) प्रमाण टक्केवारीत :  
राज्य : गर्भवती : स्तनपान करणाऱ्या 
मिझोराम : 63.75 : 56.4 
मणिपूर : 42.68 : 51.2 
मध्यप्रदेश : 6.99 : 8.9 
महाराष्ट्र : 3.70 : 3.6 
भारत : 3.95 : 5 

(स्रोत : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 15-16) 

loading image