

Highway Theft at Shikrapur
शिक्रापूर : आकाश पांडुरंग शिंदे, महेश मनाजी शिंदे व राहुल रामदास पवार असे कोठडीत रवानगी केलेल्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ता. ४ जूनला पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कोंढापुरी येथून सोपान आंधळे हे मोटारी (एम एच ०१ बी यु ०३६६) तून पत्नी व मुलीसह पुण्याच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांना झोप येऊ लागल्याने ते येथील सूरज पेट्रोल पंपासमोर मोटार उभी करून झोपलेले असताना, पहाटेच्या सुमारास एका दुचाकीहून आलेल्या तिघांनी आंधळे यांच्या कारचा दरवाजा वाजवून त्यांना कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील ५०० रुपये व पत्नी प्राजक्ता आंधळे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठन काढून घेऊन पोबारा केला होता.