हिंजवडी मेट्रोचे काम ऑगस्टमध्ये

सुधीर साबळे
बुधवार, 13 जून 2018

पिंपरी - हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या प्रस्तावित मेट्रोच्या कामाला ऑगस्टमध्ये सुरवात होईल. पीएमआरडीएने २०२० पर्यंत हिंजवडी ते बालेवाडी मेट्रो मार्ग सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे हिंजवडीतील वाहतूक कोंडी सुटेल. 

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामासाठी पीएमआरडीएने १८ जूनपर्यंत निविदा मागवल्या होत्या. मात्र, त्याला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असून, जुलै महिन्यात त्या उघडण्यात येणार आहेत. या कामासाठी टाटा ॲण्ड सिमेन्स, आयआरबी (आयडियल रोड बिल्डर) आणि आयएल ॲण्ड एफएस या कंपन्याच्या निविदा आल्या आहेत. 

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाचे काम पूर्ण होण्यास २०२२ उजाडणार आहे. बालेवाडीपर्यंतचे काम २०२० पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर हिंजवडी ते बालेवाडी या मार्गावर मेट्रोची वाहतूक सुरू होईल. त्यामुळे आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची सोय होईल. 

सध्या सकाळी आणि सायंकाळी आयटीयन्स वाहतूक कोंडीत अडकतात. बालेवाडी ते हिंजवडी मार्ग सुरू झाल्यानंतर वाकड चौकामध्ये वाहनांचे पार्किंग करून मेट्रोने हिंजवडीमध्ये जाता येईल. यामुळे वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका आणि वेळेची बचत होणार आहे.

मार्गाची लांबी - २३.३ किलोमीटर 
प्रकल्प खर्च  - ८,३१३ कोटी रुपये 
एकूण स्टेशन - २३
प्रकल्प कालावधी - ३ वर्षे

बालेवाडीमध्ये पाच हेक्‍टर जागा
पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान राबवण्यात येणारा मेट्रो प्रकल्प हा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून (पीपीपी) राबवण्यात येणार आहे. मेट्रोच्या तिकिटामधून या प्रकल्पाची रक्‍कम वसूल होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने मेट्रो मार्ग करणाऱ्या विकासकाची गुंतवणूक वसूल व्हावी, म्हणून त्याला बालेवाडी परिसरात पाच हेक्‍टर जागा देण्याचे नियोजन केले आहे. याठिकाणी त्याने इमारत बांधून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपला खर्च वसूल करायचा, अशी ही योजना आहे.

कारशेड माणमध्ये
मेट्रोची कारशेड माणमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी पीएमआरडीएने या भागात १८ हेक्‍टर जमीन खरेदी केली आहे. कारशेडमध्ये मेट्रोचे पार्किंग व देखभाल- दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. 

मार्गावरील एकून स्टेशन 
विप्रो सर्कल - हिंजवडी - शिवाजी चौक - वाकड चौक - बालेवाडी स्टेडियम - निकमार - रामनगर - लक्ष्मीनगर - बालेवाडी फाटा - पल्लोड फार्म - विद्यापीठ चौक - आरबीआय - कृषी महाविद्यालय - शिवाजीनगर - जिल्हा न्यायालय 
(हिंजवडीमधील काही आयटी कंपन्यांच्या बाहेरील बाजूस मेट्रोचे थांबे असतील.)

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान असणाऱ्या मेट्रोचे काम पीपीपी तत्त्वावर करण्यात येणार आहे. ऑगस्टमध्ये या कामाला सुरवात होईल. मेट्रोचा संपूर्ण मार्ग एलिव्हेटेड (जमिनीवर) असेल. याच्या स्टेशनच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. 
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

Web Title: hinjewadi metro work in august