हिंजवडीच्या वाहतूक कोंडीत आता मेट्रोची भर

Hinjewadi traffic congestion due to metro work
Hinjewadi traffic congestion due to metro work

पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर यादरम्यान सुरू झालेले मेट्रोचे काम, भूमकर चौकातून आयटी पार्क आणि मारुंजीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नेहमीची वाहतूक कोंडी, बंद सिग्नल, यामुळे आयटी कर्मचारी वैतागले आहेत. ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस, एमआयडीसी आणि पीएमआरडीए यांच्याकडून नियोजन होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेळेचे गणित बिघडत आहे.

पीएमआरडीएने हिंजवडीमधील फेज तीनमधून शिवाजी चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर मेट्रोच्या कामाला सुरवात केली आहे. विप्रो सर्कल परिसरालगत असणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी काही भाग मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेड लावून बंद केल्यामुळे कोंडी होत आहे.

चक्राकार वाहतुकीमुळे वेळेमध्ये बचत होत होती. मात्र, आता हे गणित बिघडले असल्याचे राहुल डांगे या अभियंत्याने सांगितले. आयटी पार्कला जोडणाऱ्या पर्यायी रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत मेट्रोने खांबांची उभारणी करू नये. पावसाळ्यानंतर अर्धवट रस्त्याची कामे मार्गी लावावीत, असे अमित सुमंत या अभियंत्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com