

Scenic Beauty and Devotion Draw Visitors to Kambareshwar Temple Near Bhatghar Dam
sakal
भोर: तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या कांबरे (ता.भोर) येथील ऐतिहासिक कांबरेश्वर मंदिर पाण्याबाहेर आले आहे. या मंदिराचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि सकाळ-सायंकाळचे वेळवंडी नदीपात्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी भाविकांसह पर्यटकांची गर्दी सुरू झाली आहे.