मंदीरांसह ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हायला हवे- डॉ. राहुल देशपांडे

राज्याच्या ग्रामीण भागातील मंदीरे हा आपला वैभवशाली वारसा आहे
शारदानगर (ता. बारामती)- येथे आयोजित परिवर्तन व्याख्यानमालेत बोलताना डॉ. राहुल देशपांडे.
शारदानगर (ता. बारामती)- येथे आयोजित परिवर्तन व्याख्यानमालेत बोलताना डॉ. राहुल देशपांडे.sakal

बारामती : राज्याच्या ग्रामीण भागातील मंदीरे हा आपला वैभवशाली वारसा आहे, या पुरातन मंदीरांसह इतर ऐतिहासिक वास्तूंचे जतन केलेच पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून विविध मंदीरांचा अभ्यास करणारे डॉ. राहुल देशपांडे परिवर्तन व्याख्यानमालेच्या निमित्ताने बारामतीकरांच्या भेटीस आले होते. येथील अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व भगिनी मंडळाच्या वतीने परिवर्तन व्याख्यानमालेअंतर्गत जाऊ देवाचिया गावा या विषयावर देशपांडे यांनी बारामतीकरांशी संवाद साधला.

प्रामुख्याने बारामती पंचक्रोशीतील विविध मंदीरांमध्ये असलेल्या रचना व त्यातील वेगळेपण तसेच त्याचे ऐतिहासिक महत्व या बाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले. मंदीरात जाताना ते कसे वाचले पाहिजे, त्याचा इतिहास काय आहे, त्या मागील विज्ञान नेमके असे असते व पूर्वजांनी जी काही रचना केली आहे त्या मागे त्यांचा कसा दृष्टीकोन होता याचे अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी केले. देशपांडे म्हणाले, मंदीर म्हणजे ब्रह्मांड, भारतीय तत्वज्ञान व मौखिक परंपरा यांचा मिलाफ आहे. यात अभिजात कला, शास्त्र व नियम, संवेदना, सम्यक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विज्ञान, रुढी व अव्यक्त विचार प्रणाली या सर्वांचा सुरेख संगम असतो. देवाचे अस्तित्व चराचरात आहे, आणि त्याला ते सिध्द करण्याची गरज नसते. बारामती तालुक्यातील अनेक गावातून मंदीरांचा संपन्न वारसा आहे, इतिहासाच्या खुणा जागवणारा हा ऐतिहासिक वारसा जतन केला पाहिजे.

शारदानगर (ता. बारामती)- येथे आयोजित परिवर्तन व्याख्यानमालेत बोलताना डॉ. राहुल देशपांडे.
राज्यात नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत निवडणूकीनंतर

संस्थेच्या सचिव सुनंदा पवार यांनी प्रास्ताविकात व्याख्यानाच्या आयोजनाची पार्श्वभूमी विशद केली. भगिनी मंडळाच्या मुख्य विश्वस्त सुनिता शहा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा हेतू नमूद केला. पुरी यांनी सूत्रसंचालन केले, अनिता खरात यांनी आभार मानले. या प्रसंगी प्रतिभाताई पवार, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मंदीरांचे वाचन करायला हवे...

देवदर्शनासाठी मंदीरात जाण्यापेक्षाही मंदीराचे वाचन करायला हवे, त्या मंदीराची रचना पूर्वजांनी कशी केली, त्याचा हेतू व उद्देश काय होता, संस्कृती व त्या मागील विज्ञान काय होते याचाही अभ्यास करायला हवा.

– डॉ. राहुल देशपांडे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com