शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा इतिहास येणार माहितीपटातून

डॉ. संदेश शहा
Saturday, 14 December 2019

- छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम भारतीयांचे आराध्य दैवत.

इंदापूर : छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम भारतीयांचे आराध्य दैवत असून, त्यांची राजनीती, गनिमीकावा, युद्धनीती, शेतकऱ्यांसंदर्भातील धोरण व आदर्श राजकारभाराचा देशपरदेशात अभ्यास सुरू आहे. त्यांचा मोठेपण युवापिढीस माहिती व्हावे म्हणून इंदापूर येथील सोमनाथ जगताप व प्रशांत गाडेकर या युवकांनी वेबसिरीज माध्यमातून महाराजांच्या गडकिल्ल्याचा इतिहास सफर स्वराज्याची माहिती पटाद्वारे शिवप्रेमी नागरिकांसमोर आणण्यास सुरुवात केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आतापर्यंत 7 गडांची माहिती व इतिहास त्यांनी संकलित केली असून, 15 दिवसांच्या अंतराने शिवप्रेमीपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. तसेच सोमनाथ याने अनिमेशन डिप्लोमा पूर्ण केला असून, त्याचे शिक्षण एसवाय. बी. कॉम तर प्रशांतचे एम. कॉम पर्यंत झाले आहे.

लोकशाहीची हत्या करून अर्थव्यवस्था 'आयसीयू'त : राहुल गांधी

सोमनाथ याने डॉ. बाबासाहेब पुरंदरे यांचे राजाशिवछत्रपती हे पुस्तक वाचल्यानंतर त्यास शिवछत्रपतींच्या गड किल्ल्यावर माहितीपट काढण्याची कल्पना सुचली. युवकांच्या हातात असणारा स्मार्टफोन लक्षात घेऊन त्याने युवापिढीपर्यंत शिवराय तसेच संभाजीराजे यांचे कार्य पोहोचवण्यासाठी वेबसिरीजची निवड केली. या संकल्पनेस प्रशांत याने होकार दिल्यानंतर मोहीम श्रीगणेशा सप्टेंबर महिन्यात पुण्याजवळील तोरणा गडापासून केला. त्यानंतर कर्जत जवळचा कोथळीगड (पेठचा किल्ला), पेब (विकटगड ), विशाळ -गड, रायरेश्वर, उस्मानाबाद जिल्ह्यातील भुईकोट प्रकारातील परांडा व राजमाची या गडांची माहिती त्यांनी दृश्यस्वरूपात शिवप्रेमीपर्यंत पोहोचवली. गडापर्यंत कसे जायचे, इतिहास, गडावरील ऐतिहासिक वास्तू व वस्तू, तेथील सुविधांची माहितीलोकांपर्यत घरबसल्या जात असल्याने पर्यटक, अभ्यासकांच्या संख्येत वाढ होत आहे. 

आता मंत्रालयाचे कामकाज दररोज सुरू राहणार

उपक्रमात त्यांच्यासमवेत राजेश साळुंखे, निलेश माने, सागरकस्तुरे, ओंकार विंचू तसेच अनेक ट्रेकर सहभागी झाले असून, यापुढे ही मंडळी हरिश्चंद्रगड, राजगड,हरिहरगड, लोहगड आणि साल्हेर या गडावर रात्री तर दिवसा रायगड , सज्जनगड, अजिंक्यतारा, वासोटा, शिवनेरी, सिंहगड, पुरंदर किल्ल्यांवर ट्रेकिंगचा थरार अनुभवणार आहेत. त्यानंतर जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या जलदुर्गांना भेटी देण्याचे त्यांचे नियोजन आहे.   

यासंदर्भात सोमनाथ जगताप म्हणाला, 'ग्रीनवूड क्रिएशन' या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवरती सफर स्वराज्याची (एका नव्या पर्वाची सुरुवात..) ही मराठी प्रवासी वेबमालिका सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून जगा- तील पर्यटक, ट्रेकर्स व शिवप्रेमी मंडळीना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती घर बसल्या मिळावी तसेच त्यांना तेथे जाणे सोपेव्हावे या उद्देशानेच हा उपक्रम सुरू केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: History of Forts will come with Documentary