Chandani Chowk Inauguration: चांदणी चौकाच्या नावाचा इतिहास एक फडणवीसांचा, एक अजित पवारांचा; वाचा दोन्ही कथा

दिल्लीतील चांदणी चौक सर्वांच्या परिचयाचा आहे. मात्र पुण्यातील चांदणी चौक हा अनेकांना माहित नव्हता
Chandani Chowk Inauguration
Chandani Chowk InaugurationEsakal

पुणेकरांचा प्रवास आजपासून सुसाट होणार आहे, म्हणजे वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. कारण चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं लोकार्पण आज झालं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं मोठ्या दिमाखात लोकार्पण करण्यात आलं.

दिल्लीतील चांदणी चौक सर्वांच्या परिचयाचा आहे. मात्र पुण्यातील चांदणी चौक हा अनेकांना माहित नव्हता. गेल्या काही दिवसांपासुन पुण्यातील चांदणी चौक चर्चेत आहे. आज चांदणी चौक उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. चांदणी चौक हे पुणे शहरातील कोथरुड परिसरातील ठिकाण आहे.

Chandani Chowk Inauguration
Nitin Gadkari: 'हजार कोटींचा पूल बांधून देतो पण..', अडचणीत सापडलेल्या गडकरींच्या मदतीला धावले फडणवीस

चांदणी चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असे, ती टाळण्यासाठी येथे अनेक बदल करण्यात आले आहेत. तर या कार्यक्रमावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महानगरपालिकेच्या दप्तरी या पुलाचे नाव NDA चौक असं आहे. मात्र आधीपासून या चौकाला चांदणी चौक असं का म्हणतात तर जुनी लोक सांगतात जुन्या पुलावर, दगडावर चांदणी कोरलेली होती, त्यामुळे या ठिकाणाला चांदणी चौक असं नाव पडलेलं असं ते म्हणाले.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चांदणी चौकाचं नाव कसं पडलं यावर त्यांनी एक अंदाज वर्तवला आहे. यावेळी बोलताना फडणवीस, म्हणाले की 'वाहतूक कोंडीमुळे येथे लोकांना दिवसा चांदण्या दिसतात, म्हणून या चौकाच नाव चांदणी चौक असं पडलं असावं, असं मला वाटतं होतं.

Chandani Chowk Inauguration
Ajit Pawar: 'अनेक वर्षे पुण्याचा पालकमंत्री होतो, आजवर पुण्यात झेंडावंदन..', अजित पवारांची ध्वजारोहणाबद्दल पहिली प्रतिक्रिया

तर चांदणी चौकाच्या नावावर चर्चा होत असतानाच आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चांदणी चौकाच्या संदर्भात दोन्ही दादांनी निर्णय घ्यावा, मी मंजुरी देतो असं म्हणून एक प्रकार समेट घडवून आणण्यचा प्रयत्न केला आहे. नितीन गडकरी म्हणाले की, आता चांदणी चौकाचे नवीन नाव दोन्ही दादांनी म्हणजेच चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांनी मिळून ठरवावे. मी त्याला मान्यता देईल. गडकरींच्या या विधानामुळे उपस्थितांच्या भूवया उंचावल्या होत्या.

तर याला चौक असे म्हणत असले तरी प्रत्यक्षात येथे ४ पेक्षा अधिक रस्ते एकत्र येतात. या ठिकाणचे रस्ते चांदणीसारखे दिसतात त्यामुळे त्याला चांदणी चौक म्हटले जाते असाही अंदाज अनेक जण वर्तवतात. येथील रस्त्यांची रचना अत्यंत गुंतागुंतीची असल्याने याला चांदणी चौक असे नाव दिले असावे असंही काही जण म्हणतात.

Chandani Chowk Inauguration
Ajit Pawar: अजित पवार अन् एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर? अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या नाराजीबद्दल स्पष्टच सांगितलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com