डर्क ट्रॅक स्पर्धेत हितेश घाडगेची चमकदार कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

मांजरी - कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रसिद्ध डर्क ट्रॅक मोटरसायकल स्पर्धेत हडपसर येथील बुलेट रायडर हितेश घाडगे या खेळाडूने ३५० सी. सी गटात प्रथम क्रमांक मिळवला. द फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स ऑफ इंडिया यांच्या वतीने कोल्हापूर मोटर स्पोर्ट्स तर्फे या डर्क ट्रॅक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

शेंडा पार्क मैदानावर झालेल्या दोन दिवसीय या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरील ७० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. ९०० मीटरच्या नैसर्गिक ट्रॅकवर विविध १४ प्रकारात ही स्पर्धा रंगली. फॉरेन ओपन ३५० सीसी गटात हितेश घाडगे याने अप्रतिम रायडिंगचे कोशल्य दाखवत प्रथम क्रमांक पटकावला. दगड चिखलाने बरबटलेल्या खडतर रस्त्यावर हितेश याने हे यश मिळवल्याने त्याचे प्रेक्षक आणि चाहत्यांनी अभिनंदन केले. 

हितेश घाडगे याने देशातील विविध मोटर सायकल स्पर्धेत भाग घेऊन क्रीडा क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे. पुणे नॉनस्टॉप ते कारगिल अंतर बुलेटवर पार करण्याचा विक्रम त्याने नोंदविला आहे. या यशाबद्दल त्याचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Hitesh Ghadge's brilliant performance in the Dirk Track competition