Pune News : होर्डिंगचे नूतनीकरण पण नियमांकडे दुर्लक्ष

एप्रिल २०२३ पासून हे शुल्क प्रति चौरस फूट ५८० रुपये इतके करण्यात आले आहे.
hoarding permission rules state govt safety of people business
hoarding permission rules state govt safety of people businessesakal

Pune News : राज्य सरकारने होर्डिंगच्या परवानगीसाठी नियमावली तयार केली असली तरी जुन्या होर्डिंगचे नूतनीकरण केले जात असले तरी या नियमावलीत नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा होर्डिंग व्यावसायिकांच्याच हिताला प्राधान्य दिले असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान शहरातील १९०० अधिकृत होर्डींगपैकी १५०० होर्डिंगचे नूतनीकरण झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. शहरात महत्त्वाचे चौक, रस्ते या ठिकाणी इमारती, मोकळ्या जागांवर लोखंडी सांगडा उभारून त्यावर जाहिरात प्रसिद्ध करण्याचा मोठा व्यवसाय शहरात आहे. यापूर्वी होर्डिंगसाठी प्रतिचौरस फूट २२२ रुपये इतके शुल्क आकारले जात होते.

पण एप्रिल २०२३ पासून हे शुल्क प्रति चौरस फूट ५८० रुपये इतके करण्यात आले आहे. महापालिकेने गेल्या १० वर्षापासून शुल्क वाढविले नव्हते, पण गेल्या १० वर्षाचे प्रतिवर्ष १० टक्के या प्रमाणे वाढ गृहित धरून हे शुल्क ५८० रुपये इतके केले आहेत.

याविरोधात काही होर्डिंग व्यावसायिकांनी याचिका दाखल केलेली असली तरी त्यावर दिलासा मिळालेला नाही. आकाशचिन्ह विभागाच्या माहितीनुसार १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी १ हजार ८१२ होर्डिंगचे परवाने नूतनीकरण होणे आवश्‍यक आहे. त्यापैकी आत्तापर्यंत १५०० होर्डिंगचे नूतनीकरण झालेले आहे.

राज्य सरकारने होर्डिंगसाठी २०२२ मध्ये नवीन नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये होर्डिंगला परवानगी देताना दोन होर्डिंगमध्ये एक मिटरपेक्षा कमी अंतर असू नये, जमिनीपासून ४० फुटापेक्षा जास्त उंची असू नये, होर्डिंगचा भाग रस्ता किंवा पादचारी मार्गावर असू नये, रस्त्यावर होर्डिंग उभारता येणार नाही.

वाहनचालकांचे लक्ष विचलीत होणार नाही, डोळ्यावर प्रकाश येणार नाही याची काळजी घेणे आवश्‍यक यासह अनेक नियम या नव्या नियमावलीमध्ये आहेत. त्यानुसार होर्डिंगमध्ये बदल न करता थेट नूतनीकरण केले जात आहे.

क्षेत्रीय कार्यालयांशी साटेलोटे

नव्या होर्डिंगला परवानगी देणे, परवान्याचे नूतनीकरण करण्याचे सर्व अधिकार क्षेत्रीय कार्यालयातील आकाश चिन्ह निरीक्षक, सहाय्यक आयुक्तांकडे आहेत. पण अनधिकृत होर्डिंग, परवाना असली तरी प्रत्यक्षात होर्डिंग आकार,

दोन होर्डिंगमधील अंतर, रस्ता आणि पादचारी मार्गावर डोकावणारे होर्डिंग, खिडक्या, गॅलरी, बंद करून लावण्यात आलेले लोखंडी सांगडे याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार गेल्यानंतर जुजबी कारवाई करून प्रकरण दाबण्याचा खटाटोप केला जात आहे.

नियमावलीतील या नियमांकडे होतंय दुर्लक्ष

- वाहन चालकाच्या डोळ्यावर तिरपा येईल इतक्या प्रखरतेच्या विद्युत रोषणाईकडे दुर्लक्ष

- दोन किंवा त्यापेक्षा जास्त रस्ते एकत्र येतात येथे थांबा रेषेपासून समोरील बाजूस २५ मिटर इतक्या अंतराच्या आत परवानगी देता येत नाही

- सार्वजनिक मैदाने, क्रीडांगणे, उद्यान, येथे परवानगी देता येणार नाही

- इमारतीच्या गच्चीवर २० फुटापेक्षा जास्त होर्डिंग उभारता येणार नाही

- होर्डिंगमुळे इमारतीतील प्रकाश कमी होणे, हवा येण्यास अडथळा निर्माण होणे

-रस्त्याच्या पृष्ठभागापासून ४० फुटापेक्षा जास्त उंचीचे होर्डिंग उभारता येणार नाही

- पदपथ नसेल अशा ठिकाणी रस्त्यावर होर्डिंग लावता येणार नाही

- एकावर एक दोन होर्डिंग उभारता येणार नाहीत

‘‘गेल्या वर्षभरात ९०० अनधिकृत होर्डिंग काढून टाकले आहेत. यंदा सुमारे १९०० होर्डिंगचे नूतनीकरण करणे आवश्‍यक आहे, त्यापैकी १५००चे काम पूर्ण झाले आहे. शासनाच्या नियमावलीचे उल्लंघन झालेल्या होर्डिंगची परवानगी रद्द केली जाईल.’’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com