पूरबाधित झोपडीधारकांना घरे

Home
Home

पुणे महापालिकेच्या एसआरए व  बीएसयूपी योजनेंतर्गत मिळण्याची शक्यता
पुणे - पुरात बेघर झालेल्या झोपडीधारकांना महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (एसआरए) आणि आर्थिक दुर्बल घटकांच्या योजनेत (बीएसयूपी) घरे मिळण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी झोपडीधारकांचा रहिवासी पुरावा, घराची नोंद आदी बाबी तपासण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधित झोपडीधारकाचे पुनर्वसन होईल.

शहरात दोन-अडीच महिन्यांतील जोरदार पावसामुळे काही भागांत पूरस्थिती निर्माण होऊन रहिवाशांचे नुकसान झाले आहे. विशेषत: झोपडपट्ट्यांच्या परिसरात पाणी शिरल्याने रहिवाशांना मोठा फटका बसला. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जनता साहत, दांडेकर, आंबिल ओढा, सहकारनगर आदी भागांतील घरे वाहून गेली. याआधी जुलैमधील पावसामुळे कोथरूड, कर्वेनगर, वारजे, येरवडा, विमाननगर, औंध, बोपोडी आदी परिसरातील घरांचे प्रचंड नुकसान झाले. या घटनांनतर पूरग्रस्तांना आर्थिक आणि आवश्‍यक ती मदत करण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, पूरग्रस्तांना तात्पुरतीच मदत झाल्याने पुनर्वसन करण्याची मागणी बेघर झालेल्या लोकांनी महपालिकेकडे लावून धरली होती. त्यानुसार महापालिकेच्या ताब्यातील ‘एसआरए’ आणि बीएसयूपी’च्या घरांत पुनर्वसन करण्याची नगरसेवकांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. 

या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.  तीत पूरग्रस्तांना ‘एसआरए’ आणि ‘बीएसयूपी’ योजनेतून घरे देण्याबाबत चर्चा झाली. 

मात्र, सरसकट पुनर्वसन करणे शक्‍य नसल्याने पूरग्रस्त भागांची नव्याने पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काही दिवसांत पाहणीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना काही उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना दिल्या आहेत. त्यांच्याकडील अहवाल आल्यानंतर पुनर्वसनाची प्रकिया सुरू केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com