
पुणे : अनिल देशमुख... राज्याचे गृहमंत्री. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्यापाठोपाठ गृहमंत्री असलेले देशमुख देखील तितकेच 'बिझी' असलेले मंत्री अशी त्यांची ओळख. पूर्वीच्या तुलनेत सध्याच्या कोरोनाच्या कालावधीत त्यांचा दिनक्रम दुप्पट
व्यस्त झाला आहे.
पोलिस दलाचे कुटुंबप्रमुख म्हणून दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलिसांना भेट देऊन, त्यांना लढण्यासाठी बळ देण्याचे काम ते करीत आहेत, तर दुसरीकडे मात्र आपल्या लाडक्या नातीला भेटण्याची ओढ मनात असूनही मागील महिन्यापासून भेटले नाहीत. कोरोनामुळे तर त्यांनी नातींपासून दूर राहणेच पसंत केले आहे, अर्थात ते त्यांच्यावरील प्रेमापोटी !
गृहमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून देशमुख राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे सर्व करत असतानाचा कोरोनाचे संकट राज्यावर चालून आले. या संकटाला डॉक्टर, परिचारीका, रुग्णालयातील कर्मचारी यांच्या इतकेच राज्यातील पोलिस देखील तितक्याच खंबीरपणे सामोरे जात आहेत. नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लाखो पोलिस सध्या रस्त्यावर उतरून नागरीकांचे संरक्षण करीत आहेत.
असे असताना या पोलिस दलाचा कुटुंब प्रमुख म्हणजेच गृहमंत्री तरी कसा मागे राहील. देशमुख हे देखील पोलिसांप्रमाणेच रस्त्यावर उतरले. केवळ दृकश्राव्य माध्यमातूनच नव्हे, तर प्रत्यक्षात पोलिस महासंचालकांपासून ते पोलिस कर्मचाऱ्यापर्यंत सगळ्यांशी संपर्क साधण्यासाठी बाहेर पडले.
नाकाबंदीच्या ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसमवेत कधी चहा घेऊन, तर कधी रात्री-अपरात्री देखील रस्त्यावर खंबीरपणे उभ्या असणाऱ्या पोलिसांना खाद्यपदार्थ, पाणी देण्यासाठी ते रस्त्यावर उतरता. पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासही ते विसरले नाहीत. त्याचबरोबर पोलिसांच्या आरोग्याच्यादृष्टीने त्यांना काळजी घेण्याचा, त्यासाठीच्या उपाययोजना करण्यासही त्यांनी प्राधान्य दिले. मुंबईहून परतताना त्यांनी चार ते पाच जिल्ह्यांच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.
देशमुख हे सध्या राज्याच्या पोलिस दलाचे कुटुंब प्रमुख म्हणून कार्यरत असले तरीही ते दोन नातींचे लाडके 'दादाजी' देखील आहेत. देशमुख यांच्या मोठ्या मुलाच्या सारिका व तारीका दोन मुली त्यांना 'दादाजी' म्हणतात. राज्यभर पोलिसांसाठी फिरत असताना देशमुख यांचा नागपुरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या सारिका व तारिका या नातींना भेटण्यासाठी जीव तुटत होता. काही दिवसांपुर्वी ते मुंबईहून नागपुरला आले. मात्र कोरोनामुळे त्यांनी नातींकडे जाण्यास टाळले. त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे दोघींशी संवाद साधला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
त्यावेळी नातींनी त्यांना 'दादाजी तुम्ही कुठे आहात' असे विचारले. त्यावर त्यांनी 'आपण, मुंबईलाच आहोत,' असे उत्तर दिले. मात्र त्यांच्या नातींनी 'तुमच्या पाठीमागे तर नागपुरमधील घरातील वस्तु दिसत आहेत' असे हजरजबाबी उत्तर दिले. एकूणच दादाजी व नातीच्या भेटीला कोरोनाने काही प्रमाणात विघ्न आणले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.