'...तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 'बारामती पॅटर्न' राबवाच!'; उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

- कोणत्याही परिस्थितीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यू दर कमी करणे गरजेचे.
- अधिकाऱ्यांवर महापालिकांतर्गत हॉटस्पॉटनिहाय जबाबदारी सोपवावी. 

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी 'बारामती पॅटर्न'नुसार कठोर उपाययोजना राबवाव्यात. सर्व अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन आणि आवश्यक उपाययोजना राबवून कोरोनाचा फैलाव थांबवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कौन्सिल हॉल येथे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले...
- कोणत्याही परिस्थितीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यू दर कमी करणे गरजेचे.
- अधिकाऱ्यांवर महापालिकांतर्गत हॉटस्पॉटनिहाय जबाबदारी सोपवावी. 
- पोलिसांनी निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करावी
- अधिकाऱ्यांमध्ये समन्वय आवश्यक
- कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग घ्यावा.

आणखी वाचा - पुणे जिल्ह्यातून गावी परत जायचंय? वाचा ही बातमी

- अति संवेदनशील भागात तपासणीचे प्रमाण वाढवण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करा.
- दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टी परिसरात तपासणी वाढवून स्वच्छतेवर भर द्या. 
- झोपडपट्टी भागातील कुटुंबीयांचे संस्थात्मक क्वारंटाईन करावे.
- नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करावे.
- खासगी दवाखाने सुरु ठेवण्याबाबत महापालिका आयुक्तांनी कडक निर्देश द्यावेत.

- Big Breaking : पुण्याचा 90 टक्के भाग खुला होणार; फक्त हॉटस्पॉटमध्ये कडक निर्बंध

ही शहरे वगळून सुरु होणार उद्योग : 
पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगाव, औरंगाबाद अशी जास्त रुग्ण संख्या असणारी शहरे वगळून अन्य ठिकाणी उद्योग सुरु करण्याची बाब राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. येथील ग्रामीण भागातील कारखानदारी सुरु करण्यासाठी नियोजन करावे. यासाठी आवश्यक नियम व  सामाजिक शिष्टाचाराचे पालन करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर शहरी भागातील कंटेन्मेंट भाग वगळता अन्य भागातील कारखानदारी बाबतही नियोजन करावे.  

- महाराष्ट्रातील १४ जिल्हे रेड झोनमध्ये;  देशात उत्तर प्रदेशात भयंकर परिस्थिती

निवारागृहात असलेल्या कामगारांना सोयी- सुविधा पुरवाव्यात. तसेच परराज्यातील मजूर, कामगारांच्या स्थलांतराबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Implement Baramati pattern in Pune city to control the coronavirus says Deputy Chief Minister Ajit Pawar