esakal | महाराष्ट्रातील १४ जिल्हे रेड झोनमध्ये;  देशात उत्तर प्रदेशात भयंकर परिस्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus lockdown Maharashtra 14 districts are red zone

एखाद्या जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही अथवा मागील 21 दिवसांत तिथे एकही बाधित आढळून आला नाही तर तो भाग ग्रीन झोन म्हणून जाहीर केला जातो. 

महाराष्ट्रातील १४ जिल्हे रेड झोनमध्ये;  देशात उत्तर प्रदेशात भयंकर परिस्थिती

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे Coronavirus : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लागू करण्यात आलेला दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हा  संपुष्टात येत असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज राज्यनिहाय रेड, ऑरेंज आणि  ग्रीन झोन जाहीर केले. दुदैवाने त्यात महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांचा समावेश आहे. देशातील बडी महानगरे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई,पुणे,  दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, पुणे, बंगळूर आणि अहमदाबाद या शहरांना रेड झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

देशात काय परिस्थिती?
देशातील 130 जिल्हे रेड झोनमध्ये टाकण्यात आले असून 284 जिल्ह्यांना ऑरेंज आणि 319 जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्या भागांतील संसर्ग दुप्पट होण्याचे प्रमाण,  चाचण्यांची व्याप्ती आणि देखरेखीनंतर हाती आलेले निष्कर्ष आदी बाबींचा आधार घेऊन ही वर्गवारी करण्यात आली आहे.  देशातील लॉकडाउन 3 मे रोजी संपुष्टात आल्यानंतर साधारणपणे एक आठवडाभर विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना याचे पालन करणे बंधनकारक असेल. 

आणखी वाचा - पुण्यात दोन दिवसांनंतर काय होणार?

ग्रीन झोनचा निकष 
एखाद्या जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही अथवा मागील 21 दिवसांत तिथे एकही बाधित आढळून आला नाही तर तो भाग ग्रीन झोन म्हणून जाहीर केला जातो. 

आणखी वाचा - पुणे जिल्ह्यातून गावी परत जायचंय? वाचा ही बातमी

राज्यनिहाय रेडझोन जिल्हयांची संख्या

 • उत्तरप्रदेश - 19
 • महाराष्ट्र - 14
 • तामिळनाडू - 12
 • दिल्ली - 12
 • पश्चिम बंगाल - 10

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सर्वाधिक ग्रीन झोन जिल्हे असणारी  राज्ये

 • आसाम - 30
 • अरुणाचल प्रदेश - 25
 • छत्तीसगड - 25
 • मध्यप्रदेश - 24
 • ओडिशा - 21
 • उत्तरप्रदेश - 20

चर्चेनंतर वर्गवारी 
मुख्य केंद्रीय सचिवांनी 30 एप्रिल रोजी  राज्यांचे मुख्य सचिव आणि  आरोग्य सचिवांसोबत संवाद साधला त्यानंतर जिल्ह्यांची ही नवी वर्गवारी जाहीर करण्यात आली.

कंटेन्मेंट झोनची नाकेबंदी

 • गर्दीवर नियंत्रणासाठीकठोर उपाय 
 • तपास नाक्यांवर लोकांची कसून तपासणी 
 • केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा यांनाच परवानगी
 • तपासणी  झाल्याशिवाय कुणालाही आत प्रवेश नाही
 • येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची नोंद
 • विशेष तपास पथकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध.
 • प्रत्येक बाधिताची तपासणी
 • रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा कसून शोध
 • बाधितांवर वैद्यकीय उपचार करणे
loading image
go to top