दिल्लीतील हिंसाचाराबाबत सुप्रिया सुळे़ म्हणाल्या...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 December 2019


''दिल्लीत होत असलेला हिंसाचार पहिला थांबला पाहिजे, ज्या भागात आंदोलन केल्यावर लाठीचार्ज होत असेल आणि ते ही कॉलेजमध्ये घुसून होत असले तर हे अतिशय दुर्दैवी आहे आणि देशासाठी घातक आहे

पुणे : ''देशात एवढे गंभीर प्रश्न असताना, दिल्लीचे पोलिस प्रशासन ज्यांच्या अखत्यारीत काम करतेय ते गृहमंत्री झारखंड प्रचारात व्यस्त आहेत. इतकेच नव्हे तर, हे सरकार केंद्रातले निवडणूक ते निवडणूक आणि फक्त प्रचारात व्यस्त असते. त्यांना प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेचं सुख-दुःख यांच्यासाठी वेळ नसतो '' अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. नागरिकत्व विधेयकाच्या दुरुस्तीवरून दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत त्या  बोलत होत्या.

हिवाळी अधिवेशन : कोण आहेत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर?

पुण्यात आज सिंचन भवनात झालेल्या बैठकीनंतर सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की,''अतिशय भयानक परिस्थिती आहे. दिल्लीचे पोलिस हे केंद्र सरकारचे असतात. हे गृहमंत्रालयाचे अजून एक अपयश आहे. इथे भारतात इतके प्रश्न गंभीर असताना, दिल्लीत बस जळत असताना पण, देशाचे जबाबदार व्यक्तिमत्व आणि गृहमंत्री हे झारखंडच्या प्रचारात आहेत, हे दुर्दैव आहे. हे सरकार केंद्रातले निवडणूक ते निवडणूक आणि फक्त प्रचारात व्यस्त असते. त्यांना प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेचं सुख-दुःख यांच्यासाठी वेळ नसते. या सगळ्या झालेल्या गोष्टीचा निषेध करते.

हिवाळी अधिवेशन : सरन्यायाधीश बोबडे शेतकऱ्यांप्रती आस्था असलेले व्यक्तिमत्त्व 

''दिल्लीत होत असलेला हिंसाचार पहिला थांबला पाहिजे, ज्या भागात आंदोलन केल्यावर लाठीचार्ज होत असेल आणि ते ही कॉलेजमध्ये घुसून होत असले तर हे अतिशय दुर्दैवी आहे आणि देशासाठी घातक आहे.''असे सांगत त्यांनी  दिल्लीतील सद्दस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. 

हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले! काय म्हणाले पाहा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister is busy in campaigning at jharkhand that is unfortunate said Supriya Sule