हिवाळी अधिवेशन : सरन्यायाधीश बोबडे शेतकऱ्यांप्रती आस्था असलेले व्यक्तिमत्त्व 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 डिसेंबर 2019

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्या. शरद बोबडे यांनी प्रयत्न केले आहे. बोबडे कुटुंबाचे नागपूरमधील निवासस्थान म्हणजे कायद्याचे झाड आहे. त्या माध्यमातून अनेक निष्णात कायदेतज्ज्ञ तयार झाले आहेत. रामशास्त्री बाण्याने ते न्यायदान केल्याशिवाय राहणार नाही.

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशपदी नियुक्त झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे हे अतिशय साधे आणि शेतकऱ्यांप्रती आस्था असलेले व्यक्तिमत्त्व असल्याची भावना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी विधानसभेत व्यक्त केली. 

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशपदी बोबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले बोलत होते. दिल्लीत अनेकदा त्यांच्याशी भेटण्याचा योग आला. न्यायमूर्ती असतानाही त्यांनी राज्यातून आलेल्या प्रत्येकाला आपले कुटुंब या नात्याने आपुलकीची वागणूक दिली. आजही त्यांची साधी राहणी प्रभावित करणारी असल्याचे नाना पटोले म्हणाले.

सविस्तर वाचा - हिवाळी अधिवेशन : सावरकरांच्या मुद्यावरून सभागृहात झळकले बॅनर

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्या. शरद बोबडे यांनी प्रयत्न केले आहे. बोबडे कुटुंबाचे नागपूरमधील निवासस्थान म्हणजे कायद्याचे झाड आहे. त्या माध्यमातून अनेक निष्णात कायदेतज्ज्ञ तयार झाले आहेत. रामशास्त्री बाण्याने ते न्यायदान केल्याशिवाय राहणार नाही. सरन्यायाधीशपदाच्या कारकिर्दीत ते अन्नदात्याला नवचैतन्य मिळवून देतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिक माहितीसाठी - हिवाळी अधिवेशन : ही ब्रिटिशांची विधानसभा आहे का? : देवेंद्र फडणवीस

न्यायव्यवस्थेला नवचैतन्य प्राप्त होईल 
महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशपदी निवड झाल्यामुळे अभिमानाने ऊर भरून येतो. मुळचे नागपूरकर असलेले शरद बोबडे यांचे अभिनंदन नागपूरच्याच अधिवेशनात करता आला, हा दुर्मिळ योगायोग आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैतन्य प्राप्त होईल. 
- उद्धव ठाकरे,
मुख्यमंत्री

क्लिक करा - महाविकास आघाडीत वाद नाही, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार : अशोक चव्हाण

सामान्यांचे वकील 
सरन्यायाधीश शदर बोबडे शेतकऱ्यांचे कैवारी असून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. ते सामान्यांचे वकील होते. 
- देवेंद्र फडणवीस,
विरोधी पक्षनेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congratulations to Sharad Bobde in the Legislative Assembly