गृहप्रकल्पांना खरेदीदारांची पसंती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

पुणे - अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो २०१८’ ला रविवारी गृहखरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुण्याच्या चौफेर असलेले गृहप्रकल्प खरेदीदारांच्या पसंतीस उतरले, तर काहींनी आवडलेल्या परिसरात फ्लॅटचे थेट बुकिंगही केले. ३० हून अधिक नामवंत बांधकाम व्यावसायिकांची १५० हून अधिक प्रकल्प खरेदीदारांना पाहता आले.

त्याला खरेदीदारांची पसंतीही मिळाली. प्लॅट्‌सपासून ते सेकंड होमसाठीचे अनेक पर्याय एक्‍स्पोत एकाच छताखाली पाहायला मिळाले. 

पुणे आणि परिसरातील गृहप्रकल्पांची माहिती गृहखरेदीदारांना मिळावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’ने या एक्‍स्पोचे आयोजन केले होते. रविवार सुटीचा दिवस असल्याने खरेदीदारांनी गृहप्रकल्पांची माहिती घेण्यासाठी गर्दी केली होती. नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी सादर केलेल्या आणि मनाला भावतील अशा गृहप्रकल्पांना खरेदीदारांनी पसंती दर्शवली. यात परवडणाऱ्या घरांची मोठी शृंखला सादर केली होती. खरेदीदारांना फ्लॅट्‌स, प्लॉट्‌स, सेकंड होमसाठीचे अनेक पर्याय आणि लक्‍झुरियस घरेही पाहता आली. त्याशिवाय घरासोबत मिळणाऱ्या सुविधा, ॲमेनिटीज, लोकेशन आणि आसपासचा परिसर या सुविधांनी त्यांना आकर्षित केले. घराविषयीच्या सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी हे एक्‍स्पो प्रभावी ठरले. त्याचबरोबर रिअल इस्टेटशी निगडित असलेली माहिती येथे खरेदीदारांना मिळाली.

मी नेहमीच ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ला भेट देते. यातून मला पुण्यातील उत्कृष्ट गृहप्रकल्पांची माहिती एकाच छताखाली घेता आली. नामवंत बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्पात वेगळेपण होते. या एक्‍स्पोतून घराचे स्वप्न नक्कीच साकार झाले.
- नीलेश देसाई, गृहखरेदीदार

Web Title: home project home purchasing