घराचं स्वप्न पूर्ण करण्याकडं खरेदीदारांचा मोर्चा; विक्रीत झाली मोठी वाढ!

Home
Home

पुणे : कोरोनाचा संसर्ग आणि त्यानंतर कामगार आणि बांधकामासाठी आवश्‍यक असलेल्या साधनांचा तुटवडा यामुळे गेल्या सहा महिन्यांत ढासळलेली बांधकाम क्षेत्रातील उलाढाल आता चांगल्या प्रकारे सुधारू लागली आहे. जूनअखेरपर्यंत कोसळलेला घर विक्रीचा आलेख सप्टेंबर अखेरीस उंचावला आहे.

एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा विचार करता जुलै ते सप्टेंबरमधील (वर्षातील तिसरी तिमाही) शहरातील घरांच्या विक्रीत 58 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. जॉन्स लॅग लसानने (जेएलएल) केलेल्या सर्व्हेतून ही बाब पुढे आली आहे. बंगळूर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकता, मुंबई आणि पुणे या शहरांत हा सर्व्हे करण्यात आला आहे. यातील सर्वांत जास्त विक्री ही चेन्नईमध्ये वाढली आहे. सातही शहरांत घरांची विक्री सरासरी 34 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.

दुसऱ्या तिमाहीत 10 हजार 753 तर तिसऱ्या तिमाहीत 14 हजार 415 हजार घरांची विक्री झाली आहे. नागरिकांनी आता पुन्हा घराचे स्वप्न पूर्ण करण्याकडे मोर्चा वळवला असल्याचे यातून स्पष्ट होते. घर खरेदीदारांचा निर्णय बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देणारा ठरला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील आर्थिक उलाढाल वाढली आहे.

शहर दुसरी तिमाही तिसरी तिमाही घर विक्रीत झालेली वाढ-घट (टक्‍क्‍यांत)
पुणे 851 1344 58
बंगळूर 1977 1742 12
चेन्नई 460 1570 241
दिल्ली 2250 3112 38
हैदराबाद 1207 2122 76
कोलकता 481 390 19
मुंबई 3527 4135 17
एकूण 10,753 14,415 34

विक्री वाढण्याची ही आहेत कारणे :
- राज्य सरकारने नोंदणी शुल्कात केलेली कपात
- विकसकांकडून देण्यात येत असलेल्या ऑफर
- कोरोनामुळे लांबलेला घर खरेदीचा निर्णय
- कोरोना काळात निर्माण झालेली स्वतःच्या घराची गरज

विकसकांकडून देण्यात येत असलेल्या ऑफर आणि पूरक सरकारी निर्णय यामुळे जुलै ते सप्टेंबरदरम्यान घर खरेदी वाढली आहे. पुढील 12 महिने घर खरेदीसाठी योग्य राहणार आहेत. घर घेण्याचे ठरविण्यापासून त्याचा व्यवहार करेपर्यंतची प्रक्रिया या काळात वाढणार आहे.
- रमेश नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जेएलएल

गेल्या तीन महिन्यांत घरांची विक्री नक्कीच वाढली आहे. मात्र त्यातून झालेली उलाढाल अद्याप कमी आहे. तसेच कामगारांचा तुटवडा कायम असून 60 ते 65 टक्के प्रकल्प सुरू झाले आहेत. सर्व परिस्थिती सुरळीत होण्यासाठी किमान सहा महिने लागतील अशी शक्‍यता आहे.
- सुहास मर्चंट, पुणे शहर अध्यक्ष, क्रेडाई

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com