Video : मुलांच्या तीन-तीन मजली इमारती असतांना, आई झाली बेघर!

homeless mother have to live on road in gokhale nagar due to children are not supporting her
homeless mother have to live on road in gokhale nagar due to children are not supporting her
Updated on

गोखलेनगर(पुणे) : मुलांना घर घेण्यासाठी स्वत:चे दागिने मोडून पैसे दिले. दोन्ही मुलांनी घरं घेतली त्यातील एक मुलगा वारला दुसरा मुलगा, दोन सुना, तीन - तीन मजली इमारती असून देखील गंगाबाई लहांडे यांना बेघर व्हावे लागले आहे. मागील सात ते आठ वर्षांपासून त्या भाड्याच्या शेडमध्ये राहतात. मागील आठवड्यात शेड पडल्याने मिळेल तिथं आश्रय घ्यावा लागत असून मागून खायची वेळ गंगाबाई यांच्यावर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
पुण्यातील गोखलेनगर येथे राहणाऱ्या गंगाबाई लहांडे यांना दोन मुलं आहेत. त्यातील एक मुलगा वारला व पती देखील वारले. पै -पै साठवून ठेवलेल्या पैशातून त्यांनी सोनं खरेदी केलं होतं. मात्र, मुलांना घर घेण्यासाठी मदत म्हणून ते सोनं मोडून पैसे दिले. गोखलेनगर परिसरात मुलांनी घरं घेतली. दोन्ही मुलांची लग्न झाली. मोठा मुलगा व पती वारल्यामुळे सुना गंगाबाईना संभाळेनात म्हणून गंगाबाई आत्मनिर्भर बनून लोकाच्या घरची धुणीभांडी करून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. वय झाल्यामुळे आजकाल त्यांना जास्त काम करता येत नाही.

गोखलेनगर परिसरातील शिवप्रताप मित्र मंडळाचे कार्यकर्ते दत्ता ताटे, मेहबूब खान, प्रकाश धामणे त्यांना मदत करतात. मागील आठवड्यात घर पडल्यामुळे गंगाबाई दोन्ही सुनांकडे राहण्यासाठी गेल्या असता. सुनांंनी त्यांना आश्रय दिला नाही. सध्या मिळेल तिथे आश्रय घेत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"मी त्यांच्या दोन सुनाकडे घेऊन गेले मात्र, सुनांनी घरात घेतले नाही. गंगाबाई यांना आश्रय मिळायला पाहिजे. त्यांच्या घरच्यांनी त्यांचे दागदागिने घेतले आहेत, म्हटल्यावर त्यांचा संभाळ करावा"
 - वनिता महाडिक, शेजारी, पाचपांडव पुणे.

"गंगाबाई यांना कोणी संभाळत नाही. आजपर्यत आम्ही त्यांना मदत केली आहे. आम्हाला मर्यादा आहेत. मुलगा, सुना असतांना देखील त्यांना संभाळत नाहीत. स्वता:ची मुलं असताना देखील त्यांना लोकांसमोर हात पसरावे लागतात ही लाजीरवाणी घटना आहे. न्यायालय, पोलिस प्रशासनाने त्यांना न्याय मिळवून द्यावा"
- महेबुब खान, सामाजिक कार्यकर्ते, गोखलेनगर पुणे 

बारामतीत कोरोनाग्रस्त रुग्ण वाढताहेत; आता आणखी...

Edited by : Sharayu Kakade

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com