बेघरांना निवारा केंद्राचा आधार

येरवडा - मदर तेरेसा सभागृहात सुरू असलेले रात्र निवारा केंद्र.
येरवडा - मदर तेरेसा सभागृहात सुरू असलेले रात्र निवारा केंद्र.

पुणे - बेघर, निराधार आणि कामानिमित्त पुण्यात आलेल्या अनेक गरिबांना राहण्याची सोय उपलब्ध नसते. त्यांना येरवडा परिसरातील मदर तेरेसा हॉलमध्ये चोवीस तास सुरू असलेल्या ‘रात्र निवारा’ केंद्राचा मोठा आधार मिळत आहे. या ठिकाणी हिंदू, मुस्लिम व ख्रिश्‍चनांसह विविध धर्मीय ऐक्‍याने राहतात.

महानगरपालिकेच्या या निवारा केंद्राचे काम जॉन पॉल झोपडपट्टी विकास प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून पाहिले जात आहे. २५ बेड असलेल्या या केंद्रात दिवसाला २० ते २५ गरजू नागरिक झोपण्यासाठी येतात. महिन्याला सरासरी  ६०० ते ७०० नागरिकांना या केंद्राचा फायदा होत आहे. इथे राहण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. अंथरूण-पांघरून, स्वच्छतागृह आदींची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर जॉन पॉल संस्थेच्या माध्यमातून नायडू रुग्णालयात उपचार केले जातात. यासाठी वॉर्डन अतुल दाभाडे हे रुग्णांना मदत करतात. तसेच, ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही त्यांना ते काढून देण्याचेदेखील काम या ठिकाणी केले जात आहे. या ठिकाणी एक व्यक्ती जास्तीत जास्त १० ते १५ दिवस राहू शकतो. त्यानंतर नवीन येणाऱ्या गरजूंना प्राधान्य दिले जाते.

सर्वसामान्य नागरिकांना धार्मिक आणि सामाजिक सेवा देण्याची गरज आहे. यामुळे आम्ही ‘रात्र निवारा’ केंद्र चालवत असून, या उपक्रमाला नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. गणपती व दिवाळी अशा सणांच्या वेळी या ठिकाणी राहणाऱ्यांची संख्या चाळीस ते पन्नासपर्यंत जाते. त्या वेळी आम्ही बेडची संख्या वाढवतो.
- जॉन पॉल, प्रमुख, जॉन पॉल झोपडपट्टी विकास प्रकल्प  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com