अहिल्यादेवी जयंतीनिमित्त उल्लेखनीय क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान

प्रा. प्रशांत चवरे
सोमवार, 11 जून 2018

भिगवण - अहिल्याबाई होळकर यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये उत्कृष्ट राजकारण व समाजकारणाचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. बालपणात वैधव्य प्राप्त होवून न डगमगता त्यांनी २८ वर्ष राज्यकारभार केला. मंदिर, मस्जिद जीर्णोद्धार, आश्रम शाळा, नदी घाट, विहीरी यामधुन आजही त्यांचे कार्य जीवंत आहे. एकविसाव्या शतकातील महिलांनीही अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे असे मत शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी व्यक्त केले. 

मदनवाडी (ता.इंदापुर) येथील पु्ण्यश्लोक अहिल्यादेवी सेवाभावी संस्थेच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांचे जयंतीनिमित्त विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, हनुमंत बंडगर,  भिगवणच्या सरपंच हेमाताई माडगे, मदनवाडीच्या सरपंच आम्रपाली बंडगर, कुंभारगावच्या सरपंच जयश्री धुमाळ, अॅड. महेश देवकाते, डि. एन. जगताप, संपत बंडगर, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, अशोक वणवे, अनिकेत भरणे, माया झोळ उपस्थित होते. यावेळी पोलिस निरिक्षक निळकंठ राठोड, मंत्रालय ग्रामविकास सचिव अनिल देवकाते, वित्तलेखा अधिकारी दयानंद कोकरे, डॉ. काशिनाथ सोलनकर, राजेंद्र वाघमोडे व इतर पंधरा मान्यवरांना अहिल्या कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

अप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, अनिल देवकाते, राजेंद्र वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. जयंतीनिमित्त अहिल्यादेवींच्या प्रतिमेची पारंपारिक पध्दतीने ढोलताशांच्या गजरात मदनवाडी भिगवण शहरातून पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. प्रास्ताविक दादा थोरात यांनी सुत्रसंचालन महादेव बंडगर व नानासाहेब मारकड यांनी तर आभार नितीन चितळकर यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन आबासाहेब देवकाते, तुकाराम बंडगर तेजस देवकाते, धनाजी थोरात आदींनी केले. 

Web Title: Honor to those who are performing in remarkable in the field on the occasion of Ahilyadevi Jayanti