मुंढव्यामध्ये होर्डिंगची चढाओढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

मुंढवा - महापालिका स्वच्छ व सुंदर शहराची साद घालत आहे. मात्र मुंढवा व केशवनगर परिसरात अनधिकृत फलाकांची जणू स्पर्धाच लागली आहे! पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर स्वतःची नावे आणि छबी झळकविणासाठी या भागात बॅनर, फ्लेक्‍स व होर्डिंगची चढाओढ सुरू आहे.

परिसरातील राजकीय कार्यकर्त्यांना फलक लावण्यासाठी परवानगी घेऊन कर भरावा लागतो, याचे भान सध्या राहिल्याचे दिसत नाही. 

उच्च न्यायालयाने बेकायदेशीर होर्डिंग व फ्लेक्‍स उतरविण्याचे आदेश मुंबई, पुण्यासह राज्यातील महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गेल्या काही दिवसांपूर्वी अनधिकृत फलकांवर कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे.

महात्मा फुले व शिवाजी चौकात राष्ट्रीय नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथी, तसेच वाढदिवस इत्यादी फ्लेक्‍सचे पीक आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसराचे विद्रूपीकरण होत आहे. बेकायदेशीर फ्लेक्‍स व होर्डिंग लावणाऱ्यांवर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने प्रकाश बोलभट यांनी केली आहे. 

याबाबत अतिक्रमण विभागाचे अधिकारी श्रीकृष्ण सोनार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिली नाही.

मांजरी रस्त्याचे फलकांमुळे विद्रूपीकरण
मुंढवा-मांजरी या रस्त्यावर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून सुमारे दीडशेहून अधिक फ्लेक्‍स लावले आहेत. या भागातील कार्यकर्ते रस्त्यावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांबरोबरच्या छबीचा समावेश असलेला फलक लावून आपले वाढदिवस साजरे करतात. वाढदिवस झाल्यानंतर हे फलक अनेक दिवस त्या ठिकाणी दिसून येत आहेत. यामुळे या रस्त्याचे विद्रूपीकरण झाले आहे.

मुंढवा व केशवनगर परिसरातील रस्त्यावर असलेले अनधिकृत बॅनर, फ्लेक्‍स व होर्डिंगवर लवकर कारवाई केली जाईल. यापुढे असे फलक उभारण्यावर प्रतिबंध केला जाईल.
- धनराज भालेराव, निरीक्षक, परवाना व आकाश चिन्ह विभाग

Web Title: hording banner issue mundhava