होर्डिंग धोरण रखडले

Hording
Hording

पुणे - महापालिकेत समावेश झालेल्या गावांमध्ये पायाभूत सेवा-सुविधा पुरविण्यात अपयश आले तरी, तेथील कर गोळा करण्याच्या दृष्टीने महापालिकेने योजना आखल्या. प्रामुख्याने बेकायदा होर्डिंग थाटणाऱ्या व्यावसायिकांना रोखण्यासाठी नवे जाहिरात धोरणही जाहीर केले आणि त्यातून वर्षाकाठी दोनशे कोटी रुपये जमा होतील, अशी आशाही निर्माण झाली. मात्र, हे धोरण कागदोपत्री पुढे सरकलेच नाही. योजनेच्या पाहणीसाठी जेवढा खर्च करण्यात आला, तेवढाही महसूल नव्या गावांतून महापालिकेला मिळालेला नाही. महसूल वाढीची ही योजना रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शहरात आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा होर्डिंग उभारल्याचे उघडकीस आले आहे. शहरात सध्या केवळ १ हजार ८८० इतकेच अधिकृत होर्डिंग असल्याची नोंद महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे आहे. त्यात १३८ इतकेच होर्डिंग बेकायदा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याची बाब दिसून आली. तेव्हाच, गेल्या वर्षी ४ ऑक्‍टोबरला हद्दीलगतची अकरा गावे महापालिकेत आली. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारपेठांचा विस्तार झाला. परिणामी, जाहिरात कंपन्या आणि व्यावसायिकांनी आपले बस्तान बसविले. त्यात परवानगी न घेता होर्डिंगही उभारण्यात आल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आली. 

या पार्श्‍वभूमीवर होर्डिंगच्या माध्यमातून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाने होर्डिंग पॉलिसी आखली आणि त्यानुसार दरही ठरविण्यात आले. त्याचा गाजावाजाही करण्यात आले आहे. त्यातून दोनशे कोटी रुपयांचा महसूल मिळेल, हेही जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, अंमलबजावणीच्या पातळीवर योजना पूर्णपणे फसल्याचे दिसून आले. किंबहुना तिची अंमलबजावणी होऊ नये, यासाठीच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

कारवाईच्या नावाखाली धूळफेक
पुणे शहरात सध्या सुमारे साडेपाच ते सहा हजार हजार होर्डिंग असल्याचे चित्र आहे. या संख्येची कबुलीही महापालिकेने दिली होती. मात्र, काही दिवसांत केवळ १ हजार ८८० होर्डिंग असल्याचा दावा महापालिकेने केला. मंगळवार पेठेत बेकायदा होर्डिंग पडून चौघांचा मृत्यू झाला त्यामुळे बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची कार्यवाही महापालिकेने केली. या कारवाईची पंधरा दिवस केवळ तोंडदेखली कारवाई करण्यात आली. त्यामुळे बहुतांशी होर्डिंग काढले जाण्याची शक्‍यता होती; परंतु तसे झाले नाही. ही मोहीम पूर्णपणे फसली आहे.

११ नवी गावे 
सुमारे ३०० होर्डिंगची ठिकाणे 
२०० कोटी वर्षाकाठी उत्पन्न
१ हजार ८८० शहरातील अधिकृत होर्डिंग
१३८ बेकायदा होर्डिंग 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com