Video : पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; गाडीचा चक्काचूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

पुणे : वारजे माळवाडीतील पश्चिम बाह्यवळण महामार्गावर दोडके टॉवरसमोर ट्रक अचानक थांबल्याने पाठीमागून येणारी कार थांबली आणि त्याच्या मागून येणारा ट्रक पुढील कारवर जोरात आदळला. उतार असल्यामुळे ट्रकला नियंत्रणात आणता आले नाही, यामुळे हा अपघात घडला. 

आज (ता. 20) सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. दोन ट्रकच्या मध्ये कार असल्याने कार दोन्ही बाजूने चेपली आहे. या अपघातात कारमधील चालक जखमी झाला आहे. एअरबॅगमुळे चालकाचे प्राण वाचले. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे.

वारजे माळवाडी परिसरात सातारा आणि मुंबईकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: horrible accident at pune near warje malwadi highway