पुण्यातील ऑक्सिजनच्या यंत्रणेची पाहणी

नाशिक घटनेनंतर पुणे महापालिकेकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal

पुणे : नाशिक येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. नायडू रुग्णालयासह बाणेर येथील कोविड हॉस्पिटल, जम्बो आणि दळवी रुग्णालयांतील ऑक्सिजनचा साठा व पुरवठ्याच्या यंत्रणेची महापालिकेने बुधवारी पाहणी केली. याबाबत सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. या यंत्रणेत दोष निर्माण होऊन तो विस्कळित होणार नाही, याकडे चोवीस तास लक्ष ठेवण्याच्या सूचना या रुग्णालयांच्या व्यवस्थापनांना करण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रुग्णालयांतील ऑक्सिजनचे टँक, सिलिंडर आणि इतर घटकांचीही पाहणी केली. शिवाजीनगर येथील जम्बो, बाणेरमधील कोविड हॉस्पिटल आणि डॉ. नायडू रुग्णालयांत ऑक्सिजन साठवून ठेवण्यासाठी टँक उभारण्यात आले आहेत. तर दळवी, लायगुडे, खेडेकर रुग्णालयांत सध्या सिलिंडरचा वापर केला जातो आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजन टँकमध्ये गळती होऊन रुग्णांचा मृत्यू झाल्याने महापालिकेनेही खबरदारीच्या दृष्टीने उपाय आखण्यास सुरुवात केली आहे.

Pune Municipal Corporation
अत्यवस्थ रुग्णांना दारे बंद; ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रुग्णालयेही अडचणीत

महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, ‘‘ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी या यंत्रणेचे ऑडिट करण्यात येईल. सर्वच रुग्णालयांतील यंत्रणा नव्याने बसविलेली आहे. तरीही सुरक्षिततेला प्राधान्य राहणार आहे.’’

कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काही रुग्णालयांतील ऑक्सिजनचा साठा सपंण्याची भीती आहे. परंतु, रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यांना गरजेनुसार उपचार देण्याची जबाबदार ही संबंधित रुग्णालयांची आहे. रुग्णालयांकडील ऑक्सिजनचा साठा, त्याचे पुरवठादार आणि पुरवठ्याची यंत्रणेची माहिती महापालिकेने मागविली आहे. साठा व पुरवठ्याची काळजी न घेणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा देणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

महापालिकेचे रुग्णालये

(ऑक्सिजन व्यवस्था असलेले)

या रुग्णालयातील रोजचा वापर ४३ टन

सध्याचा पुरवठा ३५ टन

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com