शहरातील हॉटेलचालकांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

पिंपरी - ‘खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल आणि स्वच्छता यात तातडीने सुधारणा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा,’ अशा आशयाची नोटीस अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) शहरातील १२५ हॉटेलचालकांना बजावली आहे. हॉटेलचालकांना सुधारण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर पुन्हा तपासणी होणार आहे. त्यामध्ये अस्वच्छता आढळल्यास कारवाई होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून हॉटेलिंग करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. ठरावीक पदार्थांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॉटेलमध्ये खवय्ये गर्दी करतात. मात्र, खाद्यपदार्थ दर्जेदार आहेत का? याची माहिती अनेकांना नसते. अनेक हॉटेलमध्ये अस्वच्छता असते, पिण्यायोग्य पाणी नसते. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने शहरातील १५९ हॉटेलची यादी तयार करून तपासणीचे काम हाती घेतले. अन्न आणि औषध प्रशासनाने हॉटेलसाठी ठरवलेल्या निकषांमध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तपासणीत त्रुटी आढळल्या. त्यामुळे कारवाईपूर्वी त्यांना सुधारण्याची संधी दिली आहे.

शहरातील सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, निगडी, पिंपरी कॅम्प, थेरगाव, रहाटणी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, प्राधिकरणातील हॉटेलची तपासणी केली. १५९ पैकी ३४  हॉटेलच्या तपासणीचे काम महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.

महामार्गावरील हॉटेल रडारवर
शहराप्रमाणे महामार्गावरील हॉटेलच्या तपासणीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. जुना पुणे-मुंबई मार्ग पिंपरी-चिंचवड शहरातून जातो. तसेच द्रुतगतीकडे जाणाऱ्या रस्त्याचा काही भाग या शहराशी जोडला आहे. मार्गालगत हॉटेलची संख्या वाढली आहे. तेथे येणाऱ्यांना चांगले अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी ही तपासणी केली जाणार आहे. 

हॉटेलचालकांना सुधारण्यासाठी मुदत दिली आहे. फरक पडला नाही तर संबंधित हॉटेलचा परवाना निलंबित होऊ शकतो. तसेच दोन लाख रुपयांपर्यंत दंडाची कारवाई होऊ शकते. तपासणी मोहीम अजून काही काळ सुरू राहणार आहे.’’ 
- संजय नारागुडे, सहायक आयुक्‍त, अन्न आणि औषध प्रशासन विभाग

Web Title: Hotel Owner Notice by FDA