

हॉटेल व्यावसायीकाला जीवे मारण्याची धमकी
अहिल्यानगर, ता. १९ ः माळीवाडा येथील हॉटेल व्यावसायिकाला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता.१८) रात्री घडली. ‘एकाला मारले आहे, आता तुझा नंबर आहे,’ अशी धमकी दिल्याने याप्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम गणेश कोमाकुळ (वय ३१, रा. माळीवाडा, फुलसौंदर चौक) यांनी मंगळवारी रात्री उशिरा फिर्याद दिली. गेल्या आठवड्यात झालेल्या धीरज परदेशी हत्या प्रकरणाचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. शुभम हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ९.१७ वाजता शुभमच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यानंतर ओळखले नाही का? असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर फोन करणाऱ्याने ‘एक को मारा है, अभी तेरा नंबर है,’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली आणि फोन कट केला.
धमकीच्या फोनमुळे शुभम यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप समोर आलेले नसून, त्याचा मोबाईल क्रमांक पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल चिटणीस करीत आहेत. धमकी देण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.