esakal | पुण्यात डिलिव्हरी बॉयची हॉटेल व्यावसायिकास जबर मारहाण; चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

Delivery_Boy}

फिर्यादी अग्रवाल हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांना झोमॅटोवरून एक खाद्यपदार्थाची ऑर्डर मिळाली होती.

पुण्यात डिलिव्हरी बॉयची हॉटेल व्यावसायिकास जबर मारहाण; चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : हॉटेल व्यावसायिकाने ठरलेल्या डिलिव्हरी बॉयच्या नावाची ऑर्डर रद्द करून दुसऱ्या डिलिव्हरी बॉयला दिल्याच्या कारणावरून एका डिलिव्हरी बॉयसह त्याच्या साथीदारांनी हॉटेल व्यावसायिकाच्या डोक्‍यात लोखंडी स्टॅंड घालून जबर मारहाण केली. ही घटना बाणेर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये घडली. 

रामेश्वर वाघाजी तडसे (वय.35, रा. हिंजवडी) या डिलिव्हरी बॉयसह त्याच्या साथीदारांविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विशाल विजय अग्रवाल (वय 40, रा. ऍक्‍सिस स्ट्रीट बाणेर रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

MPSC परीक्षेसह नोकरभरती पुढे ढकलावी; विनायक मेटेंची मागणी​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अग्रवाल हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांना झोमॅटोवरून एक खाद्यपदार्थाची ऑर्डर मिळाली होती. ती ऑर्डर त्यांनी रामेश्वर तडसे याला दिली होती. अग्रवाल यांनी तडसेला फोन केला. मात्र त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे अग्रवाल यांनी याबबात तत्काळ झोमॅटो कंपनीला कळविले. त्यानंतर तडसेच्या नावावरील ऑर्डर रद्द करून ती दुसऱ्या डिलिव्हरी बॉयला दिली.

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; पतीला आजन्म कारावास

त्यानंतर तडसे हा हॉटेलमध्ये आला. त्याने अग्रवाल यांना 'माझी ऑर्डर का कॅन्सल केली' असे म्हणत त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर तडसे आणि त्याच्या साथीदारांनी अग्रवाल यांच्या डोक्‍यात लोखंडी स्टँड मारून त्यांनी गंभीर जखमी केले. त्यांनी फिर्यादीच्या हॉटेलची तोडफोड करीत नुकसान केले. याप्रकरणी अग्रवाल यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)