पुणेकरांनो थर्टी फर्स्टचा प्लॅन करताय का? हॉटेल, बार सुरु ठेवण्याला वेळेचं बंधन

Hotels and bars will be open till 10.45 pm on December 31 in Pune
Hotels and bars will be open till 10.45 pm on December 31 in Pune
Updated on

पुणे : 31 डिसेंबर म्हटले की, सेलिब्रेशन हे ठरलेलंच! दरवर्षी मोठ्या उत्साहात थर्टी फर्स्टला गतवर्षाचा निरोप घेत नुतन वर्षाचे स्वागत केले जाते. दरवर्षी पुणेकर हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बारमध्ये जातात आणि रात्री 12 पर्यंत नवर्षाची वाट पाहत थर्टी फर्स्ट पार्टी करतात. त्यात यंदा 2020 वर्षाला निरोप देत 2021चे स्वागत करण्यासाठी सर्वच जण उत्सूक आहेत, पण यंदा मात्र या सेलिब्रेशनवर कोरोनाचे सावट आलेले आहे. त्यामुळे दरवर्षी थर्टीफर्स्टला हॉटेल्स आणि बारमध्ये होणाऱ्या जंगी पार्ट्या यंदा मात्र बंधनात अडकल्या आहेत. 

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन यंदा नवीन वर्षाच्या स्वागतावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. संचारबंदी लागू असल्याने यंदा थर्टी फर्स्टला रात्री पावणे अकरा वाजेपर्यंतच हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु राहणार आहेत. तसेच होम डिलिव्हरी सुविधाही पावणेअकरा वाजताच बंद होईल, असा आदेश पुणे महापालिकेने काढले आहेत. दरम्यान या निर्णयाबद्दल हॉटेलचालकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

ब्रिटनमध्ये वाढलेल्या कोरोनामुळे पुण्यात यापूर्वीच रात्री अकरानंतर संचारबंदी लागू केली आहे. पण, थर्टी फर्स्टला काय होणार? याबाबत पुणेकरांना उत्सुकता होती. यासंदर्भात महापालिकेने काढलेल्या आदेशानुसार ३१ डिसेंबरला विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच १ जानेवारीच्या स्वागतासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच सेलिब्रेशन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. शहरातील हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, बार यांच्यासोबत होम डिलिव्हरीवरही मर्यादा आणण्यात आल्या आहेत. 

पुणे रेस्टॉरंट असोसिएशनचे (पूर्व भाग) अध्यक्ष बाळासाहेब अमराळे म्हणाले, ‘‘महापालिकेच्या आदेशाचा आम्हाला आदर आहे. मात्र, त्याचा हॉटेल चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. लॉकडाउनमध्ये एवढे महिने व्यवसाय बंद होता. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने आमचा चांगला व्यवसाय होतो. त्यामुळे त्यावर अशी बंधने टाकणे योग्य नाही. त्यातून सरकारचा महसूल आणि आमचे उत्पन्न बुडणार आहे. दिवसा सर्वत्र गर्दी होतेच ना; मग रात्रीची एवढी बंधने का? महापालिकेने या निर्णयाचा पुन्हा विचार करावा. आम्ही कोरोनाविषयक खबरदारी घेऊनच व्यवसाय करीत आहोत.’

जाणून घ्या केसरचे फायदे; हाडांची मजबूती, कँसरशी लढा आणि उत्तम सेक्स लाईफ देतो केसर  

''नवीन वर्षाच्या स्वागताची उत्सुकता प्रत्येकाला असणे साहजिकच आहे. पण, कोरोनाचे संकट लक्षात घेऊन आणि पुणेकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेच हे नियम लागू केले आहेत. त्याचे पुणेकर पालन करून कोठेही गर्दी करणार नाहीत, याची खात्री आहे.''
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com