हॉटेस्ट बॉलिवूड गाण्यांचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

पुणे - बॉलिवूड गायक, संगीतकारांचा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ हा कार्यक्रम २८ व २९ एप्रिलला पुण्यात होत आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक लिनन किंग आहेत; तर सह प्रायोजक सुझुकी इन्ट्रयुडर आहेत. पुण्यात सादर होणाऱ्या या हॉटेस्ट कार्यक्रमात बॉलिवूडचे गाजलेले गायक, संगीतकार विशाल, शेखर, फरहान अख्तर, मिकासिंग व बादशाह त्यांची गाजलेली धमाल गाणी सादर करणार आहेत. 

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी फरहान अख्तर, विशाल व शेखर यांचा, तर दुसऱ्या दिवशी मिकासिंग व बादशाह यांचा सहभाग असणार आहे.

‘लकी ड्रॉ’द्वारे कपल पासेस 
विशाल व शेखर या गायक, संगीतकार द्वयीने अनेक हिंदी, तेलगू आणि मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. ‘झंकार बीटस’, ‘दस’, ‘ओम शांती ओम्‌’, ‘स्टुडंट ऑफ दी इअर’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. विशाल व शेखरबद्दल खाली काही प्रश्‍न विचारले आहेत. त्या प्रश्‍नांची योग्य उत्तरे आम्हाला summersault@esakal.com वर कळवा रात्री १२ वाजेपर्यंत आणि भाग्यवान विजेते बना. अचूक उत्तरे देणाऱ्या दोन भाग्यवान विजेत्यांना ‘लकी ड्रॉ’द्वारे मिळतील कपल पासेस. विजेत्यांची नावे ई-मेलद्वारे कळविण्यात येतील.

येथे मिळतील प्रवेशिका...
खालील ठिकाणी बुधवार(ता. १८)पासून प्रवेशिका उपलब्ध-
 यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड), बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड) (सकाळी ९ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते रात्री ८).
 ‘सकाळ’च्या शनिवारवाडा परिसरातील ५९५, बुधवार पेठ येथील कार्यालयात (सकाळी ११ ते सायंकाळी ६).

‘सकाळ टाइम्स 
समरसॉल्ट २०१८’ 
शनिवार - २८ एप्रिल 
सहभाग - फरहान अख्तर, 
विशाल व शेखर 

रविवार - २९ एप्रिल 
सहभाग - मिकासिंग, बादशाह 
कुठे - शिवछत्रपती क्रीडा संकुल, 
म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे 
केव्हा - संध्याकाळी ६ वाजल्यापासून 
ऑनलाइन बुकिंगसाठी : 
bookmyshow.com
अधिक माहितीसाठी संपर्क - ९०११०८५२५५

१. विशाल-शेखरचे पूर्ण नाव काय?
२. विशालने कुठल्या ऐतिहासिक हिंदी चित्रपटासाठी गायलेले गाणे गाजले आहे?
३. शेखरने गायलेले पहिले मराठी गाणे कोणते? 

Web Title: hotest bollywood songs