
Police Register Case After Loni-Kalambhor House Break-In
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन: लोणी काळभोर परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा सक्रिय होत घरफोडी केली. अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजे व कपाटांचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोन्या चांदीचे दागिने व रोख मिळून असा सुमारे १ लाख ६४ हजारचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना २० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते २२ सप्टेंबर रोजी सकाळी पावणे सातच्या दरम्यान घडली.